आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये तरुणींच्या छेडछाडीचा व्हिडिओ व्हायरल, 2 आरोपींना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले. - Divya Marathi
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले.
रामपूर (यूपी)  - दोन मुलींसोबत अनेक विद्यार्थ्यांनी  अश्लील चाळे केल्याचे चित्रण असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.  

 १४ तरुण विद्यार्थिंनीसोबत अश्लील चाळे करत असल्याचे चित्रीकरण करण्यात आले. या तरुणांनीच याचे चित्रण करून तो सोशल मीडियावर अपलोड केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. १४ तरुणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एक आरोपी शाहनवाज यास पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पीडितांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. 
 
रामपूरमधील तांडा पोलिसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल 
- रामपूरमधील टांडा गावात ही घटना घडली. टवाळखोरांनी गावातील एका तरुणासोबत जाणाऱ्या मुलींसोबत गैरवर्तन केले. त्यांची छेड काढली. याचा व्हिडिओ देखील तयार करुन तो सोशल मीडियावर शेअर केला. 
- छेडछाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 14 जणाविरोधात एफआयआर दाखल केला. व्हिडिओच्या आधारे त्यांनी टवाळखोरांची ओळख पटवत त्यातील दोघांना अटक केले आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. 
 
काय आहे व्हिडिओमध्ये...
- गावातील टवाळखोर तरुण रस्त्याने जाणाऱ्या दोन मुलींची छेड काढतात. त्यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी करतात. त्यांच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न करुन त्यांचा विनयभंग करताना दिसतात. 
- काही टवाळखोर मुलींची छेड काढत असताना एक-दोघे त्याचा व्हिडिओ तयार करत होते. एवढेच नाही तर, मुलींची ओढणी ओढ, अशा सुचनाही करत होते. 
- तरुणींच्या छेडछाडीचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्यामुळे आता पोलिसांचे 'रोमियो विरोधी पथक' कुठे गेले, असा सवाल लोक विचारु लागले आहे. 
 
पोलिस अधीक्षक काय म्हणाले 
- रामपूरचे पोलिस अधीक्षक विपिन ताडा म्हणाले, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. इतरांचाही कसून शोध सुरु असून त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल. 
- व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतः याची दखल घेऊन गुन्हा नोंदवला आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये, छेडछाडीचा व्हिडिओ आणि काय म्हणाले पोलिस अधीक्षक... 
बातम्या आणखी आहेत...