आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर सहा महिन्यांनी गावकरी करतात रक्तदान!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - रायपूरपासून ३० किमी अंतरावरील पलौद गाव. येथील ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ग्रामस्थांची लांबलचक रांग उभी आहे. त्यात ज्येष्ठांपासून महिला, तरुण सर्वांचाच सहभाग प्रकर्षाने जाणवतो. सहज चौकशी केली तेव्हा आम्ही रक्तदान करण्यासाठी आलो आहोत, असे उत्स्फूर्त उद््गार कानी पडतात.

गावात जुलै महिन्यांत सहाव्यांदा रक्तदानाचे शिबिर लागले. दिवसभरात ७० बाटल्या रक्तदान झाले. रेडक्रॉस ब्लड बँकेचे प्रभारी डॉ. धर्मवीर बघेल यांच्या म्हणण्यानुसार, गावात दर सहा महिन्यांना रक्तदान शिबिर भरवले जाते. समितीचे अध्यक्ष पूनारद राम म्हणाले, आमच्या गावासह शेजारच्या गावातील लोकांची गरज भागावी यासाठी या गावात रक्तदान केले जाते. गेल्या तीन वर्षांपासून आतापर्यंत ४१९ युनिट रक्तदान करण्यात आले आहे.
आता रक्ताची गरज भासणाऱ्या कुटुंबाला रक्तदानाशिवाय समितीच्या पत्रावर रेडक्रॉस व मॉडेल ब्लड बँकेतून रक्त उपलब्ध होते. सरपंच अनिता म्हणाल्या, या पुढाकारामुळे २५० रुग्णांची रक्ताची गरज भागली आहे.
तेव्हा कुणीही रक्त दिले नाही म्हणून...
यशवंत म्हणाले, २००१ मध्ये एका महिलेस शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताची गरज होती. मात्र, तशी सोय झाली नाही. रुग्णालयात गावातील लोक होते, मात्र रक्त देण्यास कोणीही तयार झाले नाही. चार वर्षांपूर्वी गावातील काही जण आजारी पडले. तेव्हाही रक्तची गरज भासली. १२०० लोकसंख्येच्या गावातील काही लोकच त्यासाठी पुढे आले. म्हणून ही मोहीम सुरू केली.

रक्तदानाची आवश्यकता किती हे घटनांतून कळते
{ शेजारी गावातील एक तेरा वर्षीय मुलगी सिकलिंग आजाराने ग्रस्त होती. तिला दर महिन्यास एक युनिट रक्त लागत होते. तिच्या कुटुंबाला कोणत्याही अडचणीशिवाय २० महिने रक्त उपलब्ध केले जात आहे.
{ गावचे ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक प्रीतराम यांची महिनाभरापूर्वी पोटाची शस्त्रक्रिया झाली. रक्ताअभावी त्यांच्या जिवाला धाेका निर्माण झाला होता. त्यांना ८ यूनिट रक्ताची गरज भासली तेव्हा त्यांना ते त्वरित उपलब्ध झाले.
बातम्या आणखी आहेत...