आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex Army Man Attempt Suicide Blaming Police For Raping Her Daughter

पोलिस करतात मुलीवर बलात्कार, सुसाइड नोट लिहून सैनिकाची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - निवृत्त सैनिक संदीप - Divya Marathi
फाइल फोटो - निवृत्त सैनिक संदीप
चंदिगड - बुधवारी सकाळी हरियाणाच्या सचिवालयातील पार्किंगमध्ये एका माजी सैनिकाने विष सेवन करून आत्महत्या केली. त्याला गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सैनिकाकडे सुसाइड नोट आढळून आले असून, पोलिस आपल्या 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत असल्याचे त्यात लिहिले होते. भितीपोटी आपण काहीही करू शकलो नसून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्याने पत्राद्वारे केली आहे.

आत्महत्या करणाऱ्याचे दुसऱ्या पत्नीवर आरोप...
- पोलिसांना मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये असे लिहिले आहे की, माझे नाव संदीप आहे, आणि मी हरियाणाच्या सोनीपतचा रहिवासी आहे.
- माझ्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तिच्यापासून मला एक मुलगी आहे. माझ्या दुसऱ्या पत्नीचे पोलिसांनी अनैतिक संबंध आहेत. पोलिस माझ्या 15 वर्षांच्या मुलीवरही अनेक महिन्यांपासून बलात्कार करत आहेत.
- पण भितीपोटी मी काहीही करू शकत नव्हतो. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संदीपचे सुसाइड नोट...