आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्र्यांच्या मृत सुनेच्या नातेवाईकांना धमकी, अंत्यसंस्काराच्या रजिस्टरमध्येही फेरफार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- बहुचर्चित मधुमिता शुक्ला हत्याकांडप्रकरणी जन्मठेप भोगत असलेले उत्तर प्रदेशाचे माजी मंत्री अमरमणि त्रिपाठी यांच्या मृत सुनेच्या नातेवाईकांना धमकीचे फोन येत आहेत. अमरमणि त्रिपाठी यांचा मुलगा अमनमणिची पत्नी सारा सिंह हिचा संशयास्पद मृत्यु झाला होता. यापार्श्वभूमीवर मृत सारा सिंहच्या नातेवाइकांनी खटला मागे घेण्यासाठी धकमावले जात आहे. इतकेच नव्हे तर सारा सिंहच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारांच्या रजिस्टरमध्येही फेरफार केल्याचे प्रकार समोर आला आहे.
सारा सिंह मृत्यूप्रकरणी सीबीआय तसेच इतर कोणत्याही चौकशीची मागणी करु नका, असेही साराच्या नातेवाइकांना ठणकावून सांगतले जात आहे. साराची आई सीमा सिंह आणि बहीण नीती मिश्रा या दोघींनाही अज्ञात व्यक्तिने फोन वरून धमकी दिली आहे. खटला मागे घेण्यासाठी अज्ञात व्यक्तिने रुपयांचे आमिष दिल्याचे दोघींनी पोलिसांना सांग‍ितले आहे.

अंत्यसंस्काराच्या रजिस्टरमध्ये फेरफार...
सारा सिंह यांच्या पार्थियावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या स्मशान भूमीतील रजिस्टरमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. रजिस्टरमध्ये साराच्या नावापुढे वाइफ ऑफ (w/o) अमनमणि लिहिले होते. ते खोडून त्या जागेवर डॉटर ऑफ (d/o) अशोक सिंह लिहिण्यात आले आहे. तसेच नगरपालिकेकडून मिळालेल्या मृत्यू प्रमाणापत्रात साराच्या पतीचे नाव नंतर घेण्यात आले. दाखला तयार करणार्‍या अधिकार्‍याने अमनमणिचे नाव का लिहिले नाही, यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही.

अमनमणिला तुरुंगात मारहाण
अमनमणिला तुरंगात गुरुवारी इतर कैद्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. अमनमणि यांनी तुरुंगात एका कैदासोबत भांडण झाले होते. नंतर अमनमणि यांना आयसोलेशन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

पत्‍नी सारा सिंहच्या संशयास्पद मृत्युनंतर अमनमणिला पोलिसांनी अटक केले होती. शुक्रवारी कोर्टाने अमनमक्षिला दोन दिवसांची कोठडी सुनावल्याने त्याना पत्नीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहाता आले नाही.
बाप-मुलाचे उडायचे खटके...
माजी मंत्री अमरमणि त्रिपाठी आणि त्यांचा मुलगा अमनमणि त्रिपाठी यांच्या नेहमी सारा सिंह हिच्यावरून खटके उडायचे. त्यामुळे बाप-मुलगा एकमेकांची अजिबात बोलत नव्हते. अमरमणिने मुलाला पत्नीशी काडीमोड घेण्यासही सांगितले होते. मात्र त्याने त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे ते साराला आपली सून मानत नव्हते.

अमनमणि आणि साराचा आर्य समाज मंदिरात झाला होता विवाह
साराची आई सीमा सिंह कॉंग्रेस नेत्या आहेत. त्या आधी समाजवादी पक्षात होत्या. सीमा यांचे पती ए.के. यांचे निधन झाले असून सीमा यांचे भाऊ एस.के. रघुवंशी यूपी सरकारच्या गृहमंत्रालयात सचिव आहेत. अमनमणिने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जुलै 2013 मध्ये लखनौमधील अलीगंज येथील आर्य समाज मंदिरात साराशी विवाह केला होता.

दरम्यान, सारा आणि अमनमक्षि गुरुवारी (9 जुलै) दुपारी स्विफ्ट कारने लखनौहून दिल्लीला जात होते. कार प्रचंड वेगात होती. दोघांनी सिटबेल्ट बांधले नव्हते. अमनमणिने ओव्हरटेक करत असताना त्याने अचानक ब्रेक लावला. कार डिव्हायडरवर धडकली. सारा उसळून कारच्या समोर असलेल्या काचेवर कोसळली. काच तुटली. डोक्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अमनमणिला मात्र किरकोळ जखमा झाल्या आहेत. यावरून संशयाचे मोहोळ उठले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, घटनेशी संबंधित फोटो....