आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EX UPA Minister Parneet Kaur\'s Name In Foreign Account Holder\'s List

स्विस बँकेत अकाऊंट असणा-यांमध्ये UPA च्या मंत्री परनीत कौर यांचे नाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : परनीत कौर

नवी दिल्ली - परदेशी बँकांमध्ये खाते असणा-या 627 जणांमध्ये यूपीए सरकारच्या काळात परराष्ट्र खात्याच्या राज्यमंत्री राहिलेल्या परनीत कौर यांच्या नावाचाही समावेश आहे. ही यादी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केली होती.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते अमरिंदर सिंह यांच्या पत्नी परनीत कौर यांच्या खात्यासंबंधी माहिती समोर आल्याने काळ्या पैशासंबंधी भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परदेशी बँकात खाती असणा-यांची नावे आल्यास काँग्रेस अडचणीत येऊ शकते असे वक्तव्य अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले होते. त्यावेळी काँग्रेसने त्यांच्यावर ब्लॅकमेल करण्याचा आरोप लावला होता.
10 वर्षांपूर्वी होते खाते
इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार स्वित्झरलँडच्या एचएसबीसीच्या मुख्य शाखेत परनीत कौर यांचे अकाऊंट नसले तरी, एचएसबीसीच्या यादीवरून दहा वर्षांपूर्वी त्यांचे या बँकेत एक खाते असल्याचे स्पष्ट होते. या खात्यात सध्या नाममात्र पैसे असल्याचेही सुत्रांचे म्हणणे आहे. सध्या सर्वाधिक रक्कम डाबर ग्रुपच्या प्रदीप बर्मन यांची असून तू सुमारे 50 कोटीच्या आसपास आहे. याच प्रकरणात नाव आलेल्या गोव्याच्या राधा सतीश टिंबलो यांनी बँकेत आपले खाते नसल्याचे म्हटले आहे. पण अधिका-यांना त्यांचे दुस-या देशातील बँकेत खाते असल्याची माहिती मिळाली आहे.
आधीही दिले आहे स्पष्टीकरण
वृत्तपत्रात दिलेल्या वृत्तानुसार परनीत कौर यांनी नुकतेच स्विस बँकेत आपले खाते नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. या प्रकरणी आपल्याला 2011 मध्ये आयकर विभागाची परवानगी मिळाली होती आणि आपण त्याचे उत्तरही दिले होते, असे परनीत कौर यांनी स्पष्ट केले आहे. त्यातही आपण आरोप फेटाळाले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.