आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तिहेरी तलाक’च्या मुद्द्यावर मौन बाळगणारेही गुन्हेगारच, योगी आदित्यनाथ यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर मौन बाळगून बसलेले राजकीय नेते ही प्रथा सुरू ठेवणाऱ्यांप्रमाणेच जबाबदार आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी केली. त्यांनी समान नागरी संहितेचेही समर्थन केले.  
 
माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात आदित्यनाथ म्हणाले की, सध्या देशात काही लोक तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत. या घटनेने मला महाभारतातील भर दरबारात झालेल्या द्रौपदी वस्त्रहरणाच्या घटनेची आठवण होते. या घटनेसाठी कोण जबाबदार आहे, असा प्रश्न ती दरबारातील लोकांना विचारते.
 
त्या वेळी कोणीही एक शब्दही काढला नाही. त्या वेळी विदुर म्हणाले होते की, ज्यांनी हा गुन्हा केला, जे या गुन्ह्यात सहभागी आहेत आणि ज्यांनी या मुद्द्यावर चुप्पी साधली आहे ते सर्वच यासाठी समान जबाबदार आहेत. मुस्लिम समाजातील तिहेरी तलाकची प्रथा संपुष्टात यावी आणि देशात समान नागरी संहितेची अंमलबजावणी व्हावी. चंद्रशेखर यांचीही तीच भूमिका होती.
 
मोदींनीही रविवारी घेतली होती ठाम भूमिका: मुस्लिम महिलांचा छळ थांबायला हवा आणि त्यांच्याशी न्याय करायला हवा, असे मत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारीच भुवनेश्वर येथे भाजपच्या अधिवेशनात तिहेरी तलाकची प्रथा संपुष्टात आणावी, असे प्रतिपादन केले होते.
 
या मुद्द्यावर मुस्लिम समुदायात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असा इशारा देतानाच, सामाजिक जागरूकतेद्वारे या मुद्द्यावर तोडगा काढावा, अशी सूचनाही केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी योगी आदित्यनाथ यांनीही या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आहे, हे विशेष.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, लाऊडस्पीकरवरील धार्मिक प्रार्थनांना सोनूने घेतला आक्षेप
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...