आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिच्या 'त्या' वगण्याला कंटाळलो होतो, पत्नीच्या हत्येनंतर जवानाने सांगितले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांच्या ताब्यात आरोपी पती विक्रम सिंह - Divya Marathi
पोलिसांच्या ताब्यात आरोपी पती विक्रम सिंह

आम्बाला- येथील बलदेव नगर पोलिस स्टेशनच्या बाहे एका निवृत्त जवानाने आपल्या पत्नीची गोळी झाडून हत्या केली. गरूवारी दूपारी ही घटना घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर जवान पळाला नाही, तर तिथेच उभा होता. गोळीचा आवाज ऐकून पोलिस बाहेर आले आणि त्याला अटक केली. पोलिसांनी ताब्यात घेल्यानंतर जवानाने रडत-रडत सांगितले की, मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो.


आरोपीने आणखी काय सांगितले...
- आरोपीने सांगितले की, तो निवृत्त जवान आहे आणि सध्या स्टेट बँक आफ इंडियामध्ये गार्डची नोकरी करत आहे.
- रडत रडत आरोप पती विक्रम सिंहने सांगितले की, त्याचे पत्नी गुरमीत कौरवर खूप प्रेम होते, परंतु गेल्या दीड वर्षआपासून तिने त्याला खूप त्रास दिला होता.
- तीन वेळा ती घरातून पळून गेली होती. एकदा तर जून 2016 मध्ये तिच्या वडिलांवर अंत्यसंस्कार झाले आणि लगेच ती घरातून पळून गेली होती. त्यानंतर अनेक दिवसांनी ती घरी परतली.
- मी कधीच तिच्यावर संशय घेतला नाही. तिला माझी संपूर्ण पगार देत होतो. तिला एक दूकान देखील सूरू करून दिले होते, परंतु तरीही तीने आपली वागणूक बदलली नाही.


घरी जाण्यास सांगितले पण तिने ऐकले नाही...
- विक्रमने सांगितले की, माझ्या पत्नीच्या आईने एका महिलेविरोधात आणि एका मुलाविरोधात बलदेव नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हे दोघे तिच्या मुलीला वश करत असल्याचा आरोप विक्रमच्या सासूने केला होता.
- त्या महिलेचे नाव तक्रारीतून काढून टाकावे असे गुरप्रीत म्हणत होती. गुरूवारी याच कामासाठी बलदेव पोलिसस्टेशनला आलो होते.
- विक्रमने तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु, तिने काहीच ऐकले नाही. शेवटी रागाच्या भरात विक्रमने तिच्यावर गोळी झाडली. मी तिच्या या वागणूकीमुळे थकलो होतो, त्यामुळे मजबूरीने मी तिला गोळी मारली.

प्रेम नसतो करत, तर मारून फेकून दिले असते...
- विक्रमने सांगितले की, पत्नी या हद्दी पर्यंत गेली होती की, मला म्हणायची- तुमच्या मुलाशी माझा काहीच संबंध नाही. मला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही.
- मी तिला गोळी मारून रस्तयावर फेकून देऊ शकलो असतो. तिचा मृतदेह कुत्र्यांना खायला दिला असता. पण मला असे करायचे नव्हते. मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. 

 

सभी फोटोः राजेश कश्यप, अम्बाला
पुढील स्लाइडवर पाहा बातमीशी संबंधित फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...