आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex Union Minister And BJP Leader Basngouda Patil Arrested

चिथावणीखोर भाषणाच्या आरोपात माजी मंत्र्यास अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजापूर - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते बासनगौडा पाटील यतनाल यांना चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यतनाल यांच्या भाषणानंतर विजापूरमध्ये दंगल उसळली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 रोजी शपथ घेतल्यानंतर ही घटना घडली. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा जल्लोष करताना दोन गटांमध्ये चकमक उडाली.
विजापूरमधील एका विशिष्ट धर्माच्या लोकांवर गुलाल उधळल्यावरून दंगल उसळली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
पोलिसांनी यतनाल यांना कोल्हापूरमधून अटक केली. त्यांच्याविरुद्ध चार खटले दाखल करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त 26 अन्य व्यक्तींना दंगल पसरवण्याचा आरोप ठेवून अटक केली. घटनेचे व्हिडिओ फुटेज तपासण्यात आले. त्यात यतनाल यांच्याविरुद्ध पुरावे आढळले. यतनाल अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये
मंत्री होते.