आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DB Exclusive: मुलायम धोकेबाज, अखिलेश पाताळयंत्री, हा सगळा स्क्रिप्टेड ड्रामा होता -अमरसिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऑगस्ट 2016 पासून जानेवारी 2017 पर्यंत समाजवादी पार्टी आणि मुलायम यांच्या कुटुंबात जे काही घडले ते एक ठरवून केलेले नाटक होते. हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर स्टीव्ह जॉर्डींगच्या इशाऱ्यावर हे सर्व होत होते असा दावा अमर सिंहांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीसारख्या मुद्द्यावरून लक्ष भरकटवणे आणि अखिलेश यांची प्रतिमा सुधारण्यासाठी हे नाटक केल्याचे अमरसिंह म्हणाले. माझा नकळतपणे यात वापर झाल्याचा दावाही त्यांनी केला. आमचे प्रतिनिधी रोहिताश्व मिश्रा यांनी घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. 
 
Q. आधी सायकलच्या चिन्हासाठी मुलायम-अखिलेश यांचे निवडणूक आयोगात जाणे, नंतर सायकल अखिलेश यांनी मिळणे, तुम्ही तर नेताजींबरोबर होता.. नेमके सायकलचे गूढ काय..?
- हा पूर्णपणे ठरवून केलेला ड्रामा होता. त्यात माझा वापर झाला. आधी मला घेऊन गेले. मी लढत होतो. मग एकदिवस मुलायम यांचा फोन आला. निवडणूक आयोगात जायला सांगितले. मला सायकल चिन्हं बंद होऊ नये म्हणून त्यावरचा दावा मागे घेण्याचा सल्ला दिला. मुलायम यांचा फोन आला, त्यांनी विचारले सायकल चिन्हं गेले तर काय होईल. मी म्हणालो, तुम्ही अध्यक्ष राहणार नाही. त्यानंतर मला परत यायला सांगितले. 
- मी परत आल्यानंतर मुलायम सिंह मला म्हणाले, आजम खान, अखिलेश, रामगोपाल यांना असे वाटते की तुम्ही मला भेटू नये. त्यामुळे पत्रकारांच्या लपून तुम्ही येत जात. परत माझ्याबरोबर निवडणूक आयोगातही येऊ नका असेही सांगितले. मुलायम दुसऱ्यांदा जेव्हा निवडणूक आयोगात गेले तेव्हा अखिलेश यांना चिन्हं देण्याचे पत्र देऊन आले. नंतर मला विदेशात जायला सांगितले, मी लंडनला निघून गेलो. 

Q. संपूर्ण वाद नाटक होता, त्यात हॉर्वर्डचे प्रोफेसर स्टीव जार्डिंग यांचा हात होता, असे म्हटले जाते, सत्य काय आहे?
- ऑगस्ट 2016 पासून जानेवारी 2017 पर्यंत जे काही झाले ते मुलायम सिंह आणि अखिलेश यादव जार्डिंग यांच्या इशाऱ्यावर करत होते. दोघांना सर्वकाही माहिती आहेत. पण जॉर्डिंग सांगतील तसे ते करत होते. मग अखिलेश यांना यूपीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणे असो अथवा शिवपाल यांचा अपमान. पण आता या सर्वाचा फायदा झाला की, त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली हे 11 मार्चला समजेलच. 

Q. कौटुंबीक वादाचे कारण काय?
- कौटुंबीक वादाचे कारण शिवपाल किंवा दुसरे कोणी नाही तर अखिलेश यांचे दोन अधिकारी नवनीत सेहगल आणि रमारमण होते. हे दोघे अखिलेश यांच्यासाठी दुभत्या गायीसारखे होते. मायावतींच्या काळातही तेच पैसे जमवून द्यायचे. यांनीच यादव सिंहला नोयडा आणि जवळपासच्या तीन प्राधिकरणांवर मुख्य अभियंता बनवले होते. 
- मुलायम यांना नवनीत आणि रमारमण दोघे नको होते. त्यांनी यांना हटवण्याचा आदेश दिला. पण दुभत्या गायींना कसे हटवणार म्हणून अखिलेश यांनी मुलायम यांचे ऐकण्यास नकार दिला. सर्व वाद इथूनच सुरू झाला. त्यानंतर दोघांचे अहंकार एकमेकांना आडवे येऊ लागले. त्यात अनेकांचे बळी गेले. 

Q. या अधिकाऱ्यांचे मोदींच्या मंत्र्यांशीहीही कनेक्शन आहे का?
- अखिलेश यांच्यासाठी काम करणारे भ्रष्ट अधिकारी रमारमण यांचे नाव मोदींच्या मंत्र्यांशीही जोडले गेले आहे. रमारमण याच्या मते त्याने मोदींच्या मंत्र्यांना मॅनेज केले आहे. महेश शर्मा आणि मनोज सिन्हा हे ते मंत्री आहेत. रमारमण यांच्यामते ते या मंत्र्यांचे खास आहेत. 
- मनोज सिन्हा माझा मित्र आहे. या वाईट लोकांपासून दूर राहा असे मी त्याला सांगू इच्छितो. मोदींना जर हे समजले तर तुमची काहीही इज्जत राहणार नाही. काहीही होऊ शकते. 

Q. अखिलेश यांना युपीच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यामागची नेमकी कथा काय आहे ?
- अखिलेश यांनी अनेक ठिकाणी मुलायम यांना योग्य तो सन्मान दिला नाही. अशा अनेक कारणांमुळे मुलायम प्रचंड रागात होते आणि आहेत. त्यादिवशीही असेच काही तरी झाले होते. अखिलेशला हटवायचे होते, त्यादिवशी मुलायम सिंह यांनी मला फोन केला. म्हणाले, तुमच्या ऑफिसमधील दोघांना माझ्याकडे पाठवा, मला अखिलेशला हटवायचे आहे. पण मी काही मूर्ख नव्हतो. आधी सर्व रामगोपाल यांच्याकडून करायचे आणि मला अडकवण्यासाठी माझी माणसे बोलावली. मी ऐकलो नाही तर शेवटी रामगोपाल यांच्या सहीनेच त्याला हटवले. 

Q. अखिलेशने मुलायम सिंह यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप लोकदलने केला आहे, हे खरे आहे का?
- मुलायम सिंहांना नजरकैदेत ठेवायचे काय, अखिलेश तर माझ्यावरही नजर ठेवून असतो. त्याने सुरक्षेमधील पाच जवानांना माझ्या मागे सोडलेले आहेत. ते माझी सर्व माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवतात. तुम्ही मुलाखत घ्यायला आले आहात, कदाचित ही माहितीही त्याच्यापर्यंत गेली असेल. 

Q. सपामध्ये कधीही काहीही चुकीचे घडले की, त्याचा ठपका अमर सिंहांवरच का येतो, तुम्ही यातून कसे वाचाल?
- मी मुलायम सिंह यांना म्हटले आहे की, आजच्यानंतर मला भेटायचे असेल तर मुलाला विचारून येत जा. अखिलेश यांचे नीकटवर्तीय मिश्रा यांना सोबत घेऊन येण्याचा पर्यायही मी दिला आहे. म्हणजे ते आमच्यात काय चर्चा झाली हे अखिलेशला सांगतील. मला आता माझ्यावर कोणतेही आरोप नको आहेत. 
 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, अमिर सिंहांची उर्वरित मुलाखत..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...