आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नटवर सिंहांचा नवा खुलासा, अमेरिकेला विचारून मंत्र्यांची नावे ठरवायचे मनमोहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी आणखी एक नवा वाद सुरू केला आहे. मनमोहन सिंग हे एवढे कमकुवत पंतप्रधान होते की, ते अमेरिकेला विचारून मंत्र्यांची नावे ठरवायचे. दिल्लीच्या अमेरिकन दुतावासात अजूनही 130 अधिकारी आहेत. त्यांच्यापैकी 25 टक्क्यापेक्षा अधिक सीआयएचे लोक आङेत. ते पॉलिटीकल लॉबिंगचे काम करतात असे, नटवरसिंह म्हणाले आहेत. मात्र, मोदी पंतप्रधान बनलेले असले तरी, अमेरिकेवर दबाव तयार होण्याची काहीही शक्यता नसल्याचेही ते म्हणाले. नटवर सिंहांनी गुरुवारी त्यांच्या आत्मचरित्राच्या हिंदी अनुवादाच्या प्रकाशनानंतर मते मांडली.

या प्रकरणी नटवर सिंह यांच्याशी झालेली चर्चा

Q. अमेरिका भारताच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करते. तसेच कोणते मंत्रालय कोणाला मिळावे व कोणाला नाही, यासाठी प्रयत्न करते हे बरोबर आहे का?
- हे पूर्णपणे सत्य असून मीही त्याचाच शिकार ठरलो आहे.
Q. ते काय प्रकरण होते?
- मनमोहन सिंग पंतप्रधान बनले त्यावेळी मला परराष्ट्र मंत्रालय मिळणार हे निश्चित होते. त्यांनी मला तशी सूचनाही केली होती. पण अमेरिकेचा मला परराष्ट्र मंत्री बनण्यास विरोध होता, असे मला सोनियांनी सांगितले होते.

Q. मग तुम्ही त्यांना काय सांगितले?
- मी सोनियांना म्हणालो, मला दुसरे कोणतेही मंत्रालय नको. आपण का दबावात येत आहोत? असा प्रश्नही मी विचारला.

पुढील स्लाइडवर वाचा उर्वरित मुलाखत...