आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला लागली होती पैशांची चटक, मजूर पतीला सोडून झाली Lady Don

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - राजस्थानमधील डोडा पोस्टच्या हायटेक तस्करीच्या आरोपात अटक लेडी डॉनबद्दल आता नवनवे खुलासे होत आहेत. लेडी डॉनचा मजूरी करणारा पती राजूरामने 'भास्कर'ला सांगितले, की तिला पैशांची हाव होती. कमी कालावधी आणि कष्टाशिवाय तिला श्रीमंत होण्याची इच्छा होती.

पतीने लेडी डॉन पत्नीबद्दल आणखी काय सांगितले...
- राजूराम भादूने सांगितले, मी प्रामाणिकपणे काम करुन उदरनिर्वाह करत होतो. चांगले राहाणीमान आणि अधिक कमाईसाठी सुमती उर्फ समताला (लेडी डॉन) घेऊन गावाकडून जोधपूरला आलो.
- रोज-मजुरीमध्ये जास्त कमाई होत नव्हती. कधी-कधी आम्हाला उपाशीही झोपावे लागत होते. नितीमत्तेने आणि प्रामाणिकपणे काम करण्यावर माझा विश्वास होता, तर समताला अल्पावधीत श्रीमंत होण्याची स्वप्ने पडत होती.
- तिला उंची राहाणीमान आणि पैशांची हाव असल्याने तिने तस्करीचा शॉर्टकर निवडला. या मार्गावर तिला तिचा भाऊ घेऊन गेला. आता ते योग्य ठिकाणी (जेलमध्ये) पोहोचले आहेत.

दारू-आफिम तस्करांसोबत पोलिसांसोबतही उठबस
तीन दिवसांपूर्वी पोलिसांच्या तावडीत सापडलेली समता बिश्नोई (31) आपल्या सौंदर्याच्या जोरावर अनेक नामी अफीम आणि दारू तस्करांना जाळ्यात अडकवत असल्याची माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे.
- तस्करांसोबतच तिने काही पोलिस अधिकाऱ्यांनाही आपल्या रुप-रंगाची मोहिनी घातली होती. असे बरेच लोक तिच्या भेटीसाठी नियमीत तिच्या बंगल्यावर येत-जात होते.
- चौकशीत हे देखील समोर आले की जोधपूरशिवाय इतरही ठिकाणी पोलिस संरक्षणात तिचा गोरखधंदा सुरु आहे.
- चौकशी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की एवढी कमी शिकलेली ही बाई चौकशीत फार मोजके आणि तोलून-मापून उत्तरे देत आहे.
- पोलिस अंमली पदार्थांच्या या तस्करीत हिच्यासोबत कोण-कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांची साठगाठ आहे याचीही बारकाईने चौकशी करीत आहेत.
लेडी डॉनने घरात पाळला कासव
- लेडी डॉन समताच्या घरात पोलिसांनी एका स्टार कासव फिरताना पाहिला. चौकशीत कळाले की तिने तो कासव पाळलेला आहे.
- तिचे म्हणणे आहे की घरात कासव पाळल्याने धंद्यात कोणती अडचण येत नाही, वास्तू दोष दूर होतो.
- पोलिसांनी बंगला सीझ केल्यानंतर आता ते कासव बंगल्यात फिरत आपल्या मालकीणीच्या परत येण्याची वाट पाहात आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोणी खोलली या तस्करांची पोल....
बातम्या आणखी आहेत...