आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चंडीगड/यमुनानगर- सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या गावात स्मशान शांतता पसरली होती. यमुनानगरमधील मंडोली येथील संजय दत्तचे वडील ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त रहिवासी होते.
मुंबईत सन 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला सुप्रीम कोर्टाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कायद्यानुसार संजूबाबा जरी दोषी असला तरी मंडोलीचे ग्रामस्थ त्याला निर्दोष समजतात. परिस्थितीनुसर त्याच्या हातून चूक झाली असेल. असे ग्रामस्थ मानतात. परंतु गुरुवारी कोर्टाचा दिलेला निकालही त्यांना मान्य आहे.
संजय दत्त सुप्रीम कोर्टाच्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करू शकतो. तसेच सुप्रीम कोर्टाच्या उच्च पीठासमोर आव्हान देऊ शकतो. आणि शेवटचा पर्याय म्हणजे राष्ट्रपतींकडे माफीसाठी याचना करू शकतो. त्यामुळे संजूबाबाची शिक्षेबाबत आता राष्ट्रपतींकडून खूप अपेक्षा व्यक्त केले जात आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा संजूबाबाचे गाव 'मंडोली'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.