नवी दिल्ली/पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या व शेवटच्या टप्प्यात गुरुवारी ५७ जागांवर विक्रमी ६० टक्के मतदान झाले. राज्यातील सर्व २४३ जागांसाठी सरासरी ५६.८ टक्के मतदान झाले. मतमोजणी व निकाल ८ नोव्हेंबरला आहेत. राज्यात बहुमतासाठी १२२ जागांची गरज आहे.
यंदाचे मतदान विक्रमी ठरले आहे. बिहारमध्ये इतके मतदान आतापर्यंतच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकांत नोंदवण्यात आले नव्हते. पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण होताच विविध संस्था-वृत्तवाहिन्यांचे निकालपूर्व सर्वेक्षण (एक्झिट पोल) जाहीर झाले. यात नितीश-लालूंच्या महायुतीला आघाडी मिळत असल्याचे चित्र अाहे. सहापैकी चार सर्व्हेंत महायुतीला स्पष्ट बहुमत वा त्याच्या जवळपास पोहोचताना दाखवले जात आहे. दोन वर्षांत अनेक अचूक एक्झिट पोल देणाऱ्या न्यूज २४ - टुडेज चाणक्यने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला तब्बल १५५ जागा दाखवत इतर सर्वेक्षणांपेक्षा वेगळा निकाल वर्तवला आहे.
नितीशच मुख्यमंत्री : लालू
बिहारमध्ये जर
आपल्या पक्षाने जदयूपेक्षा जास्त जागा जिंकल्या तरीही मुख्यमंत्रिपद नितीशकुमार यांच्याकडेच राहील, असे स्पष्टीकरण राजदप्रमुख लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केले. आपला पक्ष उपमुख्यमंत्रिपद मागणार का, या प्रश्नाला मात्र लालूंनी उत्तर देणे टाळले. निवडणुकीत महायुती १९० पेक्षा जागा जिंकेल, असा अशावाद त्यांनी व्यक्त केला. निकाल आल्यानंतर सर्व बाबींवर िवचार केला जाईल, असे ते म्हणाले.
निकालाचा केंद्राशी संबंध नाही : भाजप
बिहारचा निकाल हा मोदी सरकारला इशारा नसेल. उलट ती लालू प्रसाद, नितीश व जंगल राजला चपराक असेल, असे भाजप नेते अनंतकुमार यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार म्हणाले, एक्झिट पोल वेगळे चित्र निर्माण करत असले तरी आपण निकालांसाठी ८ नोव्हेंबरची वाट पाहायला हवी, असे ते म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, एक्झिट पोलचे अंदाज...