आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैलास मानसरोवर यात्रा : खराब नियोजन आणि चीनी सैनिकांचा अडेलतट्टूपणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शून्याच्या खाली तापमान अशूनही रूम हीटर नाही आणि आंघोळीसाठी पाणी गरम करायला गीझरची व्यवस्थाही नाही. नाथुला मार्गे कैलास मानसरोवरवर यात्रेसाठी गेलेले पहिल्या जत्थ्याचे सदस्य या मार्गे चीनला जाणारे पहिले भारतीय ठरले. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडून अनुभवांचे रिपोर्ट मागवले आहेत. त्यावरून सरकारने चीनशी चर्चा करून या मार्गावरील व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली आहे. मंगळवारी या मार्गाने यात्रेकरूंचा दुसरा जत्था चीनच्या सीमेत प्रवेश करणार आहे. पहिल्या पथकाबरोबर रेकीचे सदस्य असलेल्या अमिताभ सिन्हा यांनी त्यांचे चांगले-वाईट अनुभव शेअर केले... ते त्यांच्याच शब्दांत

आम्ही 17 जुलैला दिल्लीहून बागडोगराला पोहोचलो. पुढे 125 किलोमीटर दूर गंगटोकच्या मार्गात एवढ्या उत्साहात आमचे स्वागच झाले जणू देवच स्वर्गातून खाली आले असावेत. रस्त्यात पाच ठिकाणी स्वागत करण्यात आले. फुलांचे हार, चहापान अशी व्यवस्था होती. आयटीबीपी, बीएसएफ, लष्कर, सिक्किम टूरिझम सर्वांनीच आपलेपणा दाखवला. दुसऱ्या दिवशी सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास दादासाहेब पाटील आणि मुख्यमंत्री पवन चामलिंग स्वतः फ्लॅग ऑफ करायला आले. 151 पुजाऱ्यांनी शंखनाद करत आम्हाला निरोप दिला.

टू बाय टूच्या दोन लक्झरी बसमध्ये आम्ही गंगटोकहून पुढे आलो. आम्ही एकूण 7500 फूट उंचीवर होतो. त्याठिकाणी दोन दिवस राहून आम्ही शरीर एवढ्या उंचीवर राहण्या योग्य बनवले. या दरम्यान भजन सुरू होते. चौथ्या दिवशी पायी चालून शेराथानला पोहोचलो. अंतर केवळ 20 किमी पण उंची 14 हजार फूट. त्याठिकाणीही एक दिवस थांबलो. सर्व ठिकाणी सिक्किम टूरिझमने चांगली व्यवस्था केली होती. स्वच्छ खोल्या, गरम पाणी, गरम अंथरून सर्वकाही ठीक होते. याचठिकाणी फायनल हेल्थ चेकअपही झाले. त्यानंतरच क्लिअरन्स मिळणार होता. याठिकाणी सकाळीच जवानांबरोबर योगा करून योगा दिवस साजरा केला.

बाबा हरदयाल पोस्ट, इथे जायला चीनीही घाबरतात
त्याठिकाणाहून आम्ही 25 किमी अंतरावर असलेल्या बाबा हरदयाल पोस्ट पाहायला गेलो. ते भारतीय लष्करात शहीद झाले होते. पण आजही ते ड्युटीवर असल्याचे समजून सर्व सुविधा दिल्या जातात. त्यांच्या बराकमध्ये नेहमी हिटर सुरू असते. त्याठिकाणी असलेला त्यांचा गणवेश रोज बदलला जातो. अंथरू रोज स्वच्छ केले जाते. बाबामुळेच आपण सुरक्षित असल्याचे लष्कराचे जवान मानतात. एवढेच काय पण एक किमी अंतरावरील चीनी सैनिकांनाही एवढा विश्वास आहे की त्यांनी या परिसरात आजवर काहीही करण्याची हिम्मत दाखवलेली नाही. शेराथानमध्ये आम्ही चार वाजताच उठलो. कारण सहा वाजता प्रवास सुरू होणार होता. चीनचे घड्याळ आपल्यापेक्षा अडीच तास पुढे आहे. आपल्याकडे सहा वाजतात तेव्हा याठिकाणी साडे आठ वाजले असतील. आम्हाला सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वेळेनुसार 10 वाजता हजर राहायचे होते.

चिनी सैनिकांशी कमी बोलण्याच्या सूचना
लष्कराच्या गाड्यांबरोबर आम्ही नाथुला येथे पोहोचलो. त्याठिकाणी आम्हाला चीनचे राजदूत ली यूचेंग भेटले. चीनच्या सीमेत त्यांनी आमचे स्वागत केले. त्याठिकाणाहून आम्ही चीनच्या बसमध्ये निघालो. प्रत्येक बसमध्ये चिनी दुभाषक कम गाइडस आणि दोन सैनिक होते. आम्हाला त्यांच्याशी कमी बोलण्याच्या सूचना होत्या. काहीही विचारले तरी देवाचे स्मरण करण्यास सांगितले जायचे. तसेच एका बसमध्ये आमच्याबरोबर चार कूक, काबी चिनी पोर्टर आणि सैनिक होते.

नाथुलापासून आम्हाला 1600 किमी अंतर पूर्ण करायचे होते. डारचेनपर्यंत तिबेट प्लेट्यू (पठार) चा हा रस्ता सुमारे 15 ते 16 हजार फूट उंचीवर होता. चीनचे रस्ते चांगले आहेत. अगदी स्वच्छ पण एहकही झाड अथवा जीव आढळत नाही. नाथुला क्रॉस केल्यानंतर 200 किमी अंतर कापून आम्ही कंगमामद्ये मुक्काम केला. या पठाळी वाळवंटात चीनने आमच्यासाठी जो रँप तयार केला होता तो अर्धाच तयार झाला होता. वीज नसल्याने हिटर चालत नव्हते. तसेच पाणीही गरम करता येत नव्हते. टॉयलेट्समध्ये केवळ इंडियन सीट्स होते. या सर्व प्रकारामुळे ज्येष्ठांना चांगलीच अडचण झाली. काहींनी थंड पाण्याने आंघोळ केली. तर काहींनी पुढच्या मुक्कामी चांगल्या सुविधांची अपेक्षा करून तेथे आंघोळ करणे योग्य ठरवले.

खरेदीची बंदी
दुसऱ्या दिवशी 295 किमी अंतर कापत लाजीला पोहोचलो. रस्त्यामध्ये कापडी तंबूमध्ये आमच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. रोज सकाळी आम्ही पॅक्ड लंच सोबत घेऊन निघायचो. टेंटमध्ये गरम करायचे खायचे आणि पुन्हा प्रवास सुरू करायचा. लाजीमध्ये हॉटेलमध्ये थांबलो तेथे वीज गरम पाण्यासह सर्व व्यवस्था होती. पण कोणाशीही बोलण्याची अथवा खरेदी करण्याची परवानगी नव्हती.

चिनी अधिकाऱ्यांचे असहकार
आठव्या दिवशी आमचा तज्था 477 किमी अंतरावर अशलेल्या जोंगबा येथे पोहोचला. तापमान शून्याच्या खाली. पण समस्या त्याच वीज नाही, गरम पाणी नाही आणि इंडियन टॉयलेट सीट्स. पण देवाच्या दर्शनाला जातोय म्हणून कोणीही तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी डारचेनला पोहोचलो. हे थोटे मोठे ठिकाण होते पण भाषेची समस्या आणि चिनी अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळे आम्ही सगळे हॉटेलातून बाहेरच पडलो नाही.

राक्षस ताल: येते रावणाने केला होता तप
याठिकाणी आम्ही एका एका नव्या तयार केलेल्या हॉटेलमध्ये राहिलो. आरामदायी अंथरुणाने शीण घालवला. येथून मानसरोवर जवळच आहे. दुसऱ्या दिवशी 80 किमी बसमध्ये आणि 20 किमी ट्रॅक्टरचा प्रवास करत मानसोवरला पोहोचलो. रस्त्यात राक्षस ताल पाहिले. कैलास पर्वताच्या अगदी समोर असलेल्या याठिकाणी रावणाने तप केला होता, असे सांगितले जाते.

मानसरोवरच्या किनाऱ्यावर खुबूमध्ये आमची राहण्याची व्यस्था करण्यात आली होती. याठिकाणी लिपुलेखहून आलेला दुसरा जत्था आम्हाला भेटला. मानसरोवरमध्ये स्नान करून आलेल्या पुजाऱ्यांनी पुजा केली. मानसरोवरमधून चिनाब, ब्रह्मपुत्रा, सिंधू, करनेली (ही गोमुखात पोहोतून गंगा बनते ) या नदीया निघतात. आम्ही मानसरोवरची परिक्रमा पूर्ण केली.

उंचीवर श्वास कोंडला
दुसऱ्या दिवशी आम्ही खुबूहून 90 किमी बसमध्ये आणि 12 किमी ट्रेकिंगकरून यमद्वारच्या दर्शनाला गेलो. याठिकाणी कैलास पर्वताचे असे भव्य रूप दिसते की हात उंचावून त्याला स्पर्श करण्याची इच्छा होते. याठिकाणीच कैलास परिक्रमा सुरू होते. उंची 17 हजार फूट, तापमान उणे 3 अंश. येथे काही जणांना श्वास घेण्यास त्रास झाला. काही जणांना उलट्या, चकरा येणे, चेहरा सुजणे अशा समस्या जाणवल्या. सोबत असलेल्या डॉक्टरांनी लगेचचे सगळ्यांवर उपचार केले.

डेराफुकमध्ये सर्वाधित अव्यवस्था
पुढे आम्ही डेराफुकला पोहोचलो. हा कैलास पर्वताचा बेसकँप। पण इथेच सर्वाधिक अव्यवस्था होती. वीज नसल्याची तर आम्हाला सवयच झाली होती. त्यात इंडियन टॉयलेट्सचेही काही वाटले नाही. पण याठिकाणी टॉयलेट्सना दरवाजेही नव्हते. पुरुषांसाठी दहा आणि काही अंतरावर महिलांसाठी तेही विना दरवाजाचे टॉयलेट्स होते. मी रेकीसाठी अॅडव्हान्स पार्टीमध्ये हेलिकॉप्टरद्वारे गेलो होतो, तेव्हा मी चिनी अधिकाऱ्यांना याचे कारण विचारले, तुम्ही असेच टॉयलेट वापरता का असे विचारले, तेव्हा तो केवळ आमची चूक झाली एवढेच बोलला. मी त्यांना सांगून टॉयलेट्सना दारे लावली. डेराफुकहून कैलास परिक्रमा मार्गावर दोन किमी अंतरावर चरण स्पर्श आहे. येथे कैलास पर्वताच्या बर्फाला स्पर्श करता येतो. पण सुमारे 1600 किमी अंतराच्या प्रवासात आम्हाला एकही मंदिर आढळले नाही. जुंजीपू आणि डेल्टा मार्गे आम्ही 19 किमीचे अंतर कापत परिक्रमा पूर्ण करून डेराफूकला पोहोचलो. डेल्टाजवळ वीस हजार फूट उंचीवर या यात्रेतील सर्वात उंचीचे स्थळ आहे. या रस्त्यावर चांगलीच घसरण आहे. जराशी चूकही जीवाला धोका निर्माण करू शकते. याच्याच खाली गौरीकुंड आहे, पण त्याठिकाणी जाण्याची परवानगी नाही. पण त्याठिकाणचे पाणी तुम्हाला कुलीच्या मदतीने मागवता येते.

परतीचा मार्ग पुन्हा जोंगबा, लाजी, कंगमा, शेरथांगद्वारे गंगटोक असा आहे. या अभूतपूर्व अनुभवानंतर अव्यवस्था आणि चिनींचा अडेलतट्टूपणा याचे काहीही वाटत नाही. मी रेकी टीममध्ये होतो, म्हणून मी सरकारला रिपोर्ट दिला आहे. त्यामुळे दुसऱ्या जत्थ्याला याचा सामना करावा लागणार नाही, याचा विश्वास आहे.
(अमिताभ सिन्हा भाजपच्या मिडिया सेलचे चेअरमन आहेत.)
पुढील स्लाइड्सवर पाहा, कैलास मानसरोवर यात्रेचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...