आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Explosion In Explosive Factory, Raipur Chhatisgarh

स्फोटात क्षणात धुळीस मिळाला कारखाना, 300 मीटरपर्यंत उडाले कर्मचार्‍यांच्या शरीराचे तुकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( कारखान्याच्या राडारोड्याखाली दबलेले कर्मचार्‍याचे शरीर)

अभनपूर- छत्तीसगडच्या अभनपूरजवळ असलेल्या उरला गावातील नवभारत फ्यूज कारखान्यात गुरूवारी रात्री दीडच्या सुमारास झालेल्या स्फोटामध्ये कामावर असलेल्या पाच कर्मचार्‍यांच्या शरीराच्या चिंढड्या उडाल्या. या कारखान्यात स्फोटकांमध्ये वापरण्यात येणारे डेटोनेटींग फ्यूज वायरची निर्मिती केली जाते. कारखान्यात काम करणार्‍या पाचपैकी कोमल सिंह याच्या हाताचा पंजा कारखान्या पासून 150 मीटर अंतरावर मिळाला. घटनास्थळापासून 300 मीटरच्या अंतरावर या पाचही कर्मचार्‍यांच्या शरीराचे तुकडे जमा करण्यासाठी पोलिसांना जवळपास 2 तास लागले.
या दुर्घटनेसाठी कारखान्यातील कर्मचार्‍यानी कारखान्याच्या अधिकार्‍यांना दोषी ठरवले आहे. कर्मचार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षापासून सुरक्षा रक्षकाचे काम करणार्‍या माखन यांना अधिकार्‍यांनी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड अशा फ्यूज बनवण्याचे काम दिले होते. या स्फोटामध्ये माखन याचाही मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांनी या संपूर्ण घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत.
डेटोनेटींग फ्यूज (डीएफ) वायर तयार करणार्‍या या युनिटमध्ये रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सात लोकांची ड्यूटी होती. रात्री साडे बारा वाजता चहासाठी सुट्टी होते. याच वेळी येथे काम करत असलेल्या सुपरवायझर जितेंद्र कुमार निषाद, टेसूराम सेन आणि माखन हे तीघे चहा पिण्यासाठी कारखान्याच्या दुसर्‍या युनिटमध्ये गेले. यावेळी इतर चार जण कोमल सिंह, गणेश हरिवंश, रेखराम साहू, पुनऊराम यादव हे कारखान्यातच थांबले.
चहा पिल्यानतंर जितेंद्रने माखन याच्यासोबत कारखान्यात काम करत असलेल्या इतर चौघांसाठी चहा पाठवून दिली. चहा पाठवल्यानंतर केवळ 10 मिनिटांतच कारखान्यात मोठा स्फोट झाला आणि आकाशात मोठमोठे धुराचे ढग दिसायला लागले. कंपनीच्या वेबसाईटनुसार, ही कंपनी 1999 ला सुरू करण्यात आली होती. या कारखान्यात डेटोनेटर फ्यूज, कास्ट बूस्टर आणि पीईटीएन (पेंटा इरथ्रीओटल टेट्रा नायट्रेट) याचे उत्पादन घेण्यात येत होते. काल रात्री झालेला स्फोट हा पीईटीएनमुळे झाला आहे.
नवभारत फ्यूजचे संचालक विशाल सिंह यांनी या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या पाचही कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी सव्वा दोन कोटी आणि कुटुंबातील एका सदस्याला कारखान्यात नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.