आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू- जम्मू आणि काश्मिरमध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी हल्ले केले. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला. त्यात भारतीय सैन्याचे लेफ्टनंट कर्नल आणि काही जवान शहीद झाले. हा हल्ला नुकत्याच केनियातील नैरोबी येथे करण्यात आलेल्या एका मॉलसारखाच होता. दोन्ही हल्ल्यांमध्ये बरेच साम्य आढळून आले. दोन्ही ठिकाणी दहशतवाद्यांनी अतिशय क्रौर्य दाखवले. हिरानगर येथील हल्ल्यातील एका प्रत्यक्षदर्शीने थरारक अनूभव सांगितला आहे. त्याने स्वतःचे नाव 'सलीम खान' असे सांगितले. त्यामुळे त्याला दहशतवाद्यांनी जिवंत सोडले. त्याचे खरे नाव सोहनलाल आहे. हल्ला झाला त्यावेळेस तो त्याच्या दुकानात होता.
सोहनलालने सांगितले, की मी तीन दहशतवाद्यांना दुकानासमोर ऑटोरिक्षातून उतरताना पाहिले. ते 'पाकिस्तान जिंदाबाद, इस्लाम जिंदाबाद', असे नारे लगावत होते. काही वेळाने त्यांनी ऑटोचालकाला गोळी मारली. तो खाली पडलेला पाहून मी मदतीसाठी सरसावलो. परंतु, दहशतवाद्यांनी मला रोखून ठेवले. त्यांनी माझे नाव विचारले. मी 'सलीम खान' असे नाव सांगितले. त्यांनी विचारले मी कुठचा राहणार आहे. त्यावर मी उत्तरलो, 'डोडा.' हे एकून एक जण म्हणाला, तू अल्ला चा बंदा आहे. म्हणून तुला सोडत आहे. एवढे सांगून ते पोलिस ठाण्यात घूसले.
हिरानगरमध्येच एक प्रत्यक्षदर्शी प्रविणने सांगितले, दहशतवादी एक किंवा दोन तासांनी आले असते तर अनेक जणांचे प्राण गेले असते. हिरानगर पोलिस ठाण्याजवळ एक कॉलेज आहे. त्यामुळे 10 वाजता दहशतवादी आले असते तर अनेक जणाची हत्या झाली असती.
थोडक्यात बचावले अनेक जवानांचे कुटुंबिय... वाचा पुढील स्लाईडमध्ये..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.