आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण... दुर्दैवी, करुण कहाण्या: 10 दिवसांनी विवाह, तुटल्या हातांनी घेतेय वडिलांंचा शोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - ही आहे २० वर्षांची रुबी गुप्ता. तिचा विवाह १ डिसेंबरला होणार आहे. दोन बहिणी, दोन भाऊ व पित्यासोबत ती मऊला (आजमगड) जात होती. अपघातात रुबीचा एक हात तुटला. तिचे वडील तिला सापडले नाहीत. तुटलेला हात घेऊन रुबी पित्याला अपघातस्थळी आणि रुग्णालयांत शोधत राहिली. हातात प्रचंड वेदना व आप्त सापडत नसल्याने रुबीचा धीर सुटला होता. लग्नासाठी घेतलेले कपडे व दागिन्यांची सोबत असलेली बॅगही सापडलेली नाही.

उपचार करून पित्याला शोधायला ती आली
अपघातात झालेल्या जखमेवर प्रथमाेपचार झाले की एक मुलगी डोक्याला पट्टी बांधून लगेच वडिलांचा शोध घेण्यासाठी परतली. उशिरापर्यंत तिला वडील सापडले नाहीत.
अंधारात लोकांचे अवयव पायदळी तुडवले गेले
- राजकुमार गुप्ता (कोच एस4)
- डॉ. क्षिप्रा द्विवेदी (कोच एस1)
- आयुषी आनंद (कोच बी3)
पहाटेचे ३.०० वाजले असतील. आम्ही एस ४ बोगीत होतो तेव्हा अचानक जोराचा झटका बसला. मागचे डबे एकमेकांवर चढल्यामुळे एवढा मोठा झटका बसला की डब्यातील प्रवासी किंकाळले. बाहेर पाहतो तर डबा रुळापासून २५ मीटर अंतरावर शेतात फेकला होता. अनेक डबे चेमटले. अंधरात जिथे कुठे पाऊल पडेल तिथे लोकांचे अवयव विखुरल्याचे जाणवले. काही जण खिडकी, दरवाजातून हात हलवत,ओरडत मदतीसाठी धावा करत होते. एस ३ आणि एस २ पूर्णपणे चेमटले होते. त्या बोगीतील अनेक मृतदेह अडकले. हातापायांचे तुकडे डब्याबाहेर पडले होेते.

क्षिप्रा म्हणाली, डब्यात अनेक जण गंभीर जखमी झाले होते. अनेकांचा जीव जाताना पाहिले. प्रवाशांचे तुकडे विखुरले होते. आयुषी आनंद म्हणाली, माझी बहीण आसनांमध्ये अडकली होती. आईचा पायही अडकला होता. दोघींचे पाय मोडले. बोगीत पाहते तर अनेकांचे हातपाय तुटले, धड वेगळे पडले होते.

बोगीत पडलेल्या मृतदेहांत दोन मुले जिवंत सापडली
रेल्वेच्या उलटलेल्या बोगींमधून काही तासांनी दोन मुलांना जिवंत बाहेर काढण्यात आले. या दोघांचे वय सहा-सात वर्षांचे आहे. त्यांच्यासोबत एका महिलेसह मृतदेह पडलेले हाेते.

एका मुलीचा मृत्यू, दुसरी अजूनही सापडली नाही
सिवानच्या रत्निका पांडेय व त्यांच्या मुलीचा अपघातात मृत्यू झाला. दुसरी मुलगी सापडलेली नाही. एका लग्नासाठी हे कुटुंब इंदूरहून पाटण्याला जात होते.
पुढील स्लाइडवर वाचा....
मुलाचा शोध, पित्याला सापडले फक्त पाकीट
आई-वडिलांचा मृत्यू झाला, अडीच वर्षांची सृष्टी वाचली
बातम्या आणखी आहेत...