आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Blocked User Account Of A User Over Uploading Nude Photo Of Jain Muni

जैन मुनिंचा फोटो फेसबुकने अश्लिल ठरवून हटवला, युझरचे अकाऊंट केले ब्‍लॉक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- फेसबुकवर जैन मुनिचे छायाचित्र अपलोड करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. हा फोटो न्‍यूड असल्‍याचे सांगून या व्‍यक्तीचे फेसबुक अकाऊंट ब्‍लॉक करण्‍यात आले. तसेच फेसबुकने यासंदर्भात इशारादेखील दिला. त्‍यामुळे छत्तीसगडमधील जैन समुदायाने तीव्र नाराजी व्‍यक्त केली आहे.

यासंदर्भात मिळालेल्‍या माहितीनुसार, जशपूर जिल्‍ह्यातील अंशुल जैन रारा यांनी दिगम्‍बर जैन मुनि पुण्‍यनंदी यांचे 3 फोटो स्‍वतःच्‍या फेसबुक वॉलवर अपलोड केले होते. अपलोड केल्‍याच्‍या काही वेळाने फेसबुकने अंशुल यांना एक संदेश पाठविला. त्‍यात जैन मुनिंचे फोटो आक्षेपार्ह असल्‍याचे सांगून ते हटविण्‍यासंबंधी इशारा दिला. अंशुल यांचे अकाऊंट 48 तासांसाठी ब्‍लॉक करण्‍यात आले. तसेच भविष्‍यात असे फोटो लोड केल्‍यास अकाऊंट कायमस्‍वरुपी ब्‍लॉक करण्‍याचाही इशारा दिला.