लखनौ- न्याय मिळण्यासाठी सामान्य व्यक्तीला कोर्टाच्या पायर्या झिजवाव्या लागतात. मात्र, न्याय मिळत नाही. असाच अनुभव उत्तर प्रदेशातील एका महिला सब इन्स्पेक्टरला आला आहे. अखेर पीडित इन्स्पेक्टरने सोशल मीडियावर आपले दु:ख शेअर केले आहे. डीआयजीकडूनच या महिला सब इंस्पेक्टरची (एसआय) छेड काढल्याचा प्रकार झाला होता. न्याय मिळण्याच्या अपेक्षेने पीडितेने सोशल नेटवर्कींग साइट '
फेसबुक'वर डीआयजीकडून छेड काढण्याचे फोटोज् शेअर केले आहेत. पीडितेने पोस्ट केलेल्या फोटोंवर नेटीजन्सतर्फे संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
दरम्यान, निलंबित डीआयजी नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे. पोलिस विभाग आरोपी डीआयजी देवीप्रसाद श्रीवास्तव यांची पाठराखण करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषी डीआयजीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी पीडित एसआय अरुणा राय यांनी केली आहे.
निलंबित डीआयजीची कोर्टाने 13 जूनला जामिनावर सुटका केली आहे. अजामीनपात्र गुन्हा असून देखील दोषी डीआयजीला जामीन मिळालाच कसा? असा सवाल उपस्थित झाला आहे. दोषी आरोपीला पोलिस विभाग पाठीशी घेत आहे. विशेष म्हणजे या कामात महिला सीओ स्वर्णजीत कौर यांचा हात असल्याचा आरोप अरुणा राय यांनी केला आहे. या देशात पीडित महिला सब इन्स्पेक्टरला न्याय मिळत नसेल तर सामान्य महिलेने कोणाकडे दाद मागावी, असेही अरुणा राय यांनी 'फेसबूक'च्या माध्यमातून सांगितले आहे.
सब इन्स्पेक्टर अरुणा राय यांच्या छेडछानी प्रकरणी पोलिसांनी आरोपी डीआयजीला निलंबित केले आहे. धक्कादायक म्हणजे कोर्टाने आरोपीची जामिनावर सुटका केली आहे. अरुणा राय यांना आणखी काय हवे आहे? असा उलट सवाल पोलिसांनीच केला आहे. त्यामुळे एका महिला पोलिस कर्मचार्याच्याबाबत जर पोलिसांची अशी वागणूक असेल तर सामान्य पीडित महिलांचे काय? असा सवाल अरुणा राय यांनी केला आहे.
(छायाचित्र: पीडित सब इन्स्पेक्टर अरुणा राय)