आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Offer 2 Crores Salary To 20 Years Girl Student

वीस वर्षीय विद्यार्थिनीला फेसबुकची २ कोटी रुपयांच्या पॅकेजची ऑफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटने आपल्याला दोन कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफर दिल्याचा दावा आयआयटी मुंबईची विद्यार्थिनी आस्था अग्रवाल हिने केला आहे.
वीसवर्षीय आस्था ही आयआयटी मुंबईत कॉम्प्युटर सायन्सची चौथ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिने या वर्षी मे-जूनमध्ये फेसबुकच्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयात तिस-या वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केली. त्यानंतर कंपनीने ही प्री-प्लेसमेंट ऑफर दिली आहे.

आस्थाचे वडील अशोक अग्रवाल जयपूरमध्ये राजस्थान विद्युत प्रसारण निगममध्ये कार्यकारी अभियंता आहेत, तर तिची मोठी बहीण केमिकल इंजिनिअर आहे. आस्थाने शाळेत असताना राष्ट्रीय गुणवत्ता शोध परीक्षेत राजस्थानमध्ये सातवा क्रमांक पटकावला होता. तसेच इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्येही रौप्यपदक पटकावले होते.