आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Post Sparks Communal Tension In Nainital

फेसबुकवरील पोस्टमुळे नैनितालमध्ये धार्मिक तणाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर वादग्रस्त छायाचित्र पोस्ट केल्यानंतर नैनितालच्या रामनगरमध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. एका तरुणाने वादग्रस्त फोटो अपलोड केल्यानंतर शुक्रवारी रात्री नैनितालच्या रामनगर भागात तणाव पसरला. यामुळे एका विशिष्ट समाजाचे लोक एकत्र जमा झाले आणि पोलिस ठाण्यावर दगडफेक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी रामसिंह मीणा यांनी दिली. मीणा म्हणाले, रामनगर शिवालपूर भागात दोन समाजांमध्ये थोडीशी चकमक उडाल्याची माहिती मिळाली. या घटनेत कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. फेसबुकवर वादग्रस्त छायाचित्र पोस्ट करणार्‍या 26 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. ते म्हणाले, शहरातील स्थिती नियंत्रणात आहे आणि संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. पोलिसांनी शहरात ध्वजसंचलन केले आहे.