अमृतसर - पजांबातील अमृतसर येथे कंपनीच्या मालकासह काही लोकांनी एका मजूराला उलटे लटकवून अत्यंत निर्दयपणे मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला होता. आरोपींच्या मित्रांनी या मारहाणीचा व्हिडिओ तयार केला होता, तो आता व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे, की चोरीचा संशय असलेल्या एका मजूराला लोक बेदम मारहाण करत आहेत. एवढेच नाही तर उलटे लटकवलेल्या या मजूराला शॉक देण्याचेही त्यांच्यात चर्चा होते. त्याला एवढी मारहाण केली जाते की त्यात त्याचा मृत्यू होतो. गुरुवारी रात्री हा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात कंपनीचा मालक मजूराला शिवीगाळ करत बेदम मारहाण करताना दिसतो.
रात्री घरातून उचलून आणून केली मारहाण
मिळालेल्या माहितीनूसार, मारहाणीत मृत्यू झालेला राम सिंह (वय 35) झारखंडचा रहिवासी आहे. मोल-मजूरीच्या निमीत्ताने तो कुटुंबासह पंजाबात आला होता. कित्येक वर्षांपासून तो येथे राहात होता. फोकल पॉइंट येथील आयर्न फाउंडरी येथे तो कामाला होता. याच कंपनीचा मालक जसप्रीत सिंगने त्याच्यावर चोरीचा आरोप लावला आणि रात्रीतून त्याला त्याच्या घरातून उचलून कंपनीत आणले. तिथे त्याला उलटे टांगून बेदम माराहाण केली.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कंपनी मालक जसप्रितसिंग फरार असून त्याच्या विरोधात कलम 302 (हत्या) आणि 364 (अपहरण) नूसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस म्हणाले, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी छापेमारी सुरु केली आहे, लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधित फोटो