आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Facts About Sriharikota, Why Isro Chose Sriharikota For The Launching Of Satellite

आश्चर्यांपेक्षा कमी नाही श्रीहरिकोटा, जाणून घ्या- इस्रो येथेच का घडवते चमत्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीहरिकोटा - भारताने काल (दि-22) रोजी श्रीहरिकोटो येथून एक-दोन नव्हे तर तब्बल २० उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या स्थित केले. यावेळी आणि संपूर्ण जग भारताकडे थक्क होऊन आश्चर्याने पाहतच राहिले. एक काळ होता जेव्हा, भारताकडे उपग्रह वाहून नेण्यासाठी वाहन नव्हते. त्यामुळे उपग्रह बैलगाडीने बाहून न्यावा लागे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता जगातील अनेक देश भारताच्या पीएसएलव्ही यानाने उपग्रह अवकाशात पाठवू इच्छित आहेत.
भारताने बुधवारी पाठवलेल्या 20 उपग्रहांपैकी, साधारणपणे 17 उपग्रह हे विदेशी होते. यातील 13 उपग्रह हे अमेरिकेचे तर इतर चार उपग्रह हे कॅनडा, इंडोनेशिया, जर्मनी या देशांचे होते. प्रक्षेपणानंतर अवघ्या 26 मिनिटांत हे सर्वच्या सर्व 20 उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत जाऊन स्थापन झाले. या अत्युच्च कामगिरीनंतर आता भारत हा जगाच्या पाठीवरील रशिया-अमेरिकेनंतरचा तिसरा देश ठरला आहे. एवढेच नाही तर, आता भारताने जगातील आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असलेल्या देशांच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपण करण्याचे कसब आत्मसात केले आहे.

इस्रोने केलेल्या प्रत्येक प्रक्षेपणानंतर चर्चा होते ती श्रीहरिकोटाची. मात्र श्रीहरिकोटा हे काही वेळाच्या चर्चेपुरतेच चर्चेत राहते. पण कधी विचार केला की, प्रक्षेपण तेथूनच का होता? तर चला जाणून घेऊयात भारताच्या या लॉन्चिंग स्टेशनविषयी काही खास गोष्टी. ज्या तुम्हालाही क्वचितच माहित असतील.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, श्रीहरिकोटाशी संबंधित काही आश्चर्यचकित करणारे Facts...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...