आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facts Of Kargil War, General Pervez Musharraf Stayed On Indian Land

दहशतवादीच नव्हे तर मुशर्रफही सीमा पार करुन राहिले होते भारतीय भूमिवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय लष्करी छावणीवर हल्ला चढवून 18 जवानांना ठार मारले. काही दिवसांपूर्वी या दहशतवाद्यांनी भारतीय भूमिवर घुसखोरी केली होती असे सांगितले जात आहे. पण केवळ दहशतवादीच नव्हे तर पाकिस्तानचे तत्कालिन लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफही भारतीय भूमिवर एक दिवस राहिले होते. ही घटना कारगिल युद्धाच्या वेळी घडली होती.
पाकिस्तानचे निवृत्त कर्नल अशफाक हुसैन यांनी 'विटनेस टु ब्लंडरः करगिल स्टोरी अनफोल्ड' या पुस्तकात याचा दावा केला आहे. हुसैन यांचे हे पुस्तक 2008 मध्ये प्रकाशित झाले. त्यात सांगितले आहे, की 1999 मध्ये कारगिल सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या लष्करांमध्ये मोठे युद्ध झाले. त्यापूर्वी मुशर्रफ भारतीय भूभागात सुमारे 11 किलोमीटर आत जात एका जागी रात्रभर राहिले होते. यावेळी त्यांच्यासोबत 80 ब्रिगेडचे तत्कालिन कमांडर ब्रिगेडिअर मसूद असलम हेही होते. दोघांनी जिकरिया मुस्तकार नावाच्या जागी रात्र घालवली होती. या दाव्याने एक बाब स्पष्ट झाली, की मुशर्रफ यांनी कारगिल युद्धात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
मुशर्रफ होते जबाबदार
पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अजीज यांनी सांगितले, की परवेज मुशर्रफ यांनी संपूर्ण प्रकरण 'रफा-दफा' केले. भारताविरुद्ध युद्ध छेडण्यास तेच जबाबदार आहेत. मुशर्रफ आणि पंतप्रधान नवाझ शरीफ यांना याची पूर्ण कल्पना होती. नकाशे घेऊन स्वतः मुशर्रफ हे नवाझ शरीफ यांना भेटले होते.
पाकिस्तान भारतावर करणार होता अणू हल्ला
कारगिल युद्धाचे आणखी एक रहस्य म्हणजे अणू हल्ला. पाकिस्तानने 1998 मध्ये अणू चाचणी घेतली होती. कारगिलचे युद्ध अपक्षेपेक्षा जास्त धोकादायक होते, असे अनेक लष्करी विशेषज्ञ सांगतात. हाताबाहेर जात असलेली परिस्थिती आणि भारताच्या दमदार प्रत्युत्तराने पाकिस्तानी लष्करात गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे मुशर्रफ यांनी अणू हल्लाची तयारी केली होती. पाकिस्तानने अणू हल्ला केला तर भारतानेही प्रत्युत्तर दिले असते. त्यानंतर अणू युद्धाची सुरवात झाली असती.
पाकिस्तानी एअरफोर्सचा नव्हता पाठिंबा
कारगिल युद्धाची माहिती पाकिस्तानी एअर फोर्सच्या प्रमुखांना देण्यात आली नव्हती. त्यांना याची माहिती बाहेरुन समजली. त्यानंतर त्यांनी या युद्धात उतरण्यास नकार दिला. त्यामुळे भारतीय एअर फोर्सच्या हल्ल्याला पाकिस्तान योग्य प्रत्युत्तर देऊ शकला नाही.
पाकिस्तानचे 2700 पेक्षा जास्त जवान शहीद
या युद्धात पाकिस्तानचे 2700 पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. 1965 आणि 1971 मध्ये झालेल्या युद्धापेक्षा पाकिस्तानला कारगिलमध्ये जास्त नुकसान सहन करावे लागले होते.
पुढील स्लाईडवर बघा, भारतीय भूमीवर घुसखोरी करीत पाकिस्तानी लष्कराने असा ठाण मांडला होता...