आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजवादीच्या कार्यकर्त्याचा बलात्काराचा प्रयत्न, विवाहितेला जिवंत जाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: रुग्णालयात उपचार घेताना पीडित महिला) - Divya Marathi
(फोटो: रुग्णालयात उपचार घेताना पीडित महिला)
कानपूर - उत्तर प्रदेशातील देहात येथील भोगनीपूर भागात समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने विवाहितेवर बलात्कार करण्‍याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याला विरोध केला असता त्याने तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडिता 60 टक्के भाजली असून तिच्यावर कानपूर येथील हॅलेट रुग्णालयात उपचार आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.
भोगनीपूर भागातील पिपरी गावात गुरुवारी (25 जून) ही घटना घडली. पीडितेचा पती लक्ष्मण (नाव बदलले आहे) हा हातमजुरी करतो. गुरुवारी सायंकाळी कामावरून तो घरी येत होता. तेव्हा त्याला त्याच्या घरातून आरोप दीपक हा घराबाहेर पडताना दिसला. त्याच्या पाठोपाठ लक्ष्मणची पत्नी पेटत्या अवस्थेत बाहेर पडली. त्याने तिला लागलेली आग विझवून गावकर्‍यांच्या मदतीने तत्काळ रुग्णालयात हलवले.

लक्ष्मणने सांग‍ितले की, आरोपी दीपक हा समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याची पत्नीकडे वाईट नजरेने पाहायचा.
दीपक अंकलनेच मम्मीला जाळले...
लक्ष्मणच्या मोठ्या मुलीने सांगितले की, दीपक अंकल घरी आले होते. त्यांनी मम्मीला पकडले. तिची साडी उतरवू लागले. त‍िने त्याला विरोध केला. नंतर दीपक अंकलने तिच्या अंगावर पेटता दीवा फेकून घरातून पळून गेले.

आरोपी दीपकची गावात मोठी दहशत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी पीडितीचा पती लक्ष्मणने दिलेल्या तक्रारीवरून दीपक विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...