आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Faizabad Girl Kidnapped Ganarape Update Latest News In Marathi

बलात्कारानंतर युवतीचे दात तोडले, पोलिसांच्या दबावामुळे अग्नीऐवजी दफनविधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ/फैजाबाद (उत्तर प्रदेश) - फैजाबादमधील महाविद्यालयीन युवतीच्या सामुहिक बलात्कार आणि त्यानंतर हत्येचे प्रकरण चिघळताना दिसत आहे. पीडितेने आरोप केलेल्या व्यक्तीचे नाव नदीम असल्याचे समोर आल्यानंतर आणि पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यानंतर तणाव अधिक वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे.
बलात्कारानंतर युवतीचे दात तोडण्यात आले आणि केस देखील उपटण्यात आल्याची माहिती आहे. युवतीच्या छातीवर जखमा होत्या. रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या भावाने हिंदू रिती-रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु केली, मात्र पोलिसांनी तसे करण्यास नकार दिला. रात्री उशिरा तिचा मृतदेह जमीनीत पुरण्यात आला. यामुळे लोक संतप्त होते.
गँगरेपनंतर रस्त्याच्या कडेला फेकले
सामुहिक बलात्काराची घटना फैजाबादमधील खंडासा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. विद्यार्थीनी शेजारच्या दुकानात समोसे खरेदी करण्यासाठी गेली होती, तेव्हाच तिचे अपहरण करण्यात आले. सामुहिक बलात्कारानंतर तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी तिला बेदम मारहाण केली. बेशुद्ध झाल्यानंतर तिला बाराबंकी येथील सफदरजंग रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्याआधी तिने पोलिसांना आरोपींची नावे सांगितले आहेत.
पोलिसांनी त्यांच्या 'पद्धती'ने लिहिली तक्रार
युवतीच्या भावाचा आरोप आहे, की पोलिस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्या चार जणांवर आरोप आहे, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी त्यांच्या मनाप्रमाणे तक्रार लिहिली असल्याचा पीडित युवतीच्या कुटुंबियांचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी फक्त एकाला ताब्यात घेतले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, घटनेनंतरचे फैजाबादमधील दृष्य