आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Faizabad Girl Murder Night Police Enjoy Dance Party With Dance Girl

PHOTOS : गँगरेपनंतर परिसरात धार्मिक तणाव असताना, DIG लावत होते ठुमके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : डान्स करताना डीआईजी नीलाभजा चौधरी (निळ्या जिन्समध्ये ) आणि माजी सीडीओ अखंड प्रताप सिंह.

फैजाबाद - एका अल्पवयीन मुलीवर गँगरेप केल्यानंतर तिची हत्या केल्याने गेल्या रविवारी रात्री उत्‍तर प्रदेशच्या फैजाबाद जिल्ह्यामध्ये धार्मिक तणावाचे वातावरण होते. मात्र, त्यावेळी जिल्ह्याचे प्रमुख पोलिस अधिकारी एका रंगारंग सोहळ्यात नाचगाण्याच्या कार्यक्रमात व्यस्त होते.
फैजाबाद रेंजचे डीआयजी नीलाभजा चौधरी आणि फैजाबादचे माजी सीडीओ अखंड प्रताप सिंह यांचे काही नाचगाण्याच्या कार्यक्रमातील फोटो समोर आले आहेत. हे फोटो 17-18 ऑगस्टचे आहेत. त्याच रात्री गँगरेप आणि हत्येच्या पीडितेच्या पार्थिवाला पोलिसांनी तणावाचे कारण पुढे करत बळजबलीने दफन केले होते. कुटुंबीयांना मुलीच्या पार्थिवावर हिंदु परंपरेनुसार अंत्यसंस्कार करायचे होते. पण पोलिसांनी तसे करू दिले नाही.
दरम्यान, पोलिस अधिका-यांचे हे फोटो समोर आल्यानंतर जिल्हाधिका-यांनी या प्रकरणी अहवाल मागवला आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
मंगळवारी ही छायाचित्रे समोर आल्यानंतर पोलिस अधिकारी कोणालाही उत्तर देण्यास तयार नाहीत. डीआयजींनी सांगितले की, ते सीआरपीएफच्या 63 बटालीयनच्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. तर माजी सीईओंनीही आपल्याला पाहुणे म्हणून आमंत्रण आल्याचे सांगितले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अधिकारी आणि सीआरपीएफ जवानांनी डान्स गर्ल्सबरोबर लावलेले ठुमके.