आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fake Ias Case Ruby Choudhary Was Special One In Lal Bahadur Shastri National Academy News In Marathi

EXCLUSIVE: तोतया अधिकारी रूबीला घाबरायचे मसुरीतील ट्रेनी आयएएस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः तोतया आयएएस ट्रेनी रूबी चौधरीला अटक करताना पोलिस)
मसुरी/देहरादून- उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादुर शास्त्री प्रशासकीय अकादमीत बनावट दस्ताऐवजच्या आधारावर प्रवेश घेणार्‍या एका म‍हिला तोतया ट्रेनी आयएएसचा पर्दाफाश झाला. आरोपी रुबी चौधरीने अकादमीत बिनघोरपणे जवळपास सहा महिने ट्रेनिंग घेतले. परंतु, यादरम्यान रूबी चौधरीने अकादमीत अापला दबदबा निर्माण केला होता. रुबीला सगळे ट्रेनी आयएएस घाबरत होते. रुबी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

नागरी सेवेत निवड झालेल्या उमेदवारांना लाल बहादुर शास्त्री प्रशासकीय अकादमीत प्रशिक्षण दिले जाते. ही संस्था दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे.

मिळालेली माहिती अशी की, रुबी अन्य ट्रेनी आयएएसशी बोलताना मोठ्या आत्मविश्वासाने बोलत असे. एवढेच नव्हे तर रुबीच्या बोली बच्चनपुढे कोणाचेही चालत नव्हते. सगळे तिला दबकून राहायचे. त्यामुळे ती 'तोतया' असेल, असा कोणालाही संशय आला नाही.

विशेष म्हणजे रुबीला 27 मार्चला अकादमी सोडल्याच्या काही दिवसांनंतर ही घटना उजेडात आली. प्रशासकीय अधिकारी सत्यवीर सिंह यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानुसार यूपीतील मुजफ्फरनगरहून आलेल्या या महिलेने 20 सप्टेंबर रोजी रुबी सिंह या नावाने स्वत:ची ओळख देऊन आपण प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले. अत्यंत कडेकोट सुरक्षेच्या या संस्थेत तिला प्रवेश कसा मिळाला, याची कसून चौकशी केली जात आहे.
मसुरी अकादमीतील काही ट्रेनी आयएएसने सांगितले की, रूबीकडे बुलंद आत्मविश्वास होता. त्याच्या जोरावर ती सगळ्यांशी बोलायची. 19 डिसेंबरला 2014 ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येणार होते. त्याच्या दोन दिवसांपूर्वी तयारी सुरु असताना एका ट्रेनीने रूबीला पाहून एक सवाल केला, 'हू आर यू, आय हॅवेंट सीन यू हेअर?' त्यावर रुबी संतापली आणि म्हणाली, 'हू आर यू? आय हॅवेंट सीन यू इन द अकादमी? नेव्हर! टेल मी हू आर यू?' हे ऐकून ट्रेनी आयएएसच नव्हे तर अन्य सहकारी देखील आश्चर्यचकीत झाले. सगळ्यांना अक्षय कुमारचा 'स्पेशल 26' या सिनेमाची आठवण झाली. अक्षय कुमारने ज्याप्रमाणे शेवटपर्यंत आपल्या तोतया टीमचा पर्दाफाश होऊ दिला नाही. अगदी तसेच रुबीने देखील ती तोतया ट्रेनी आयएएस असल्याचे कोणालाही समजू दिले नाही.
अकादमीच्या मुख्यप्रवेशद्वारातून येत जात नव्हती रुबी...
अकादमीत दोन प्रवेशद्वार आहेत. परंतु रुबीने मुख्य प्रवेशद्वारातून कधीच ये-जा केली नाही. कारण मुख्य प्रवेशद्वारवर आयटीबीपीचे सूरक्षा जवान 24 तास तैनात राहात होते. रुबी नेहमी खालील प्रवेशद्वाराने येत होती.
उत्तराखंडचे डीजीपी बी.एस.संधू यांनी सां‍गितले की, रूबी नैनीतालमध्ये दीड महिना एसडीओ बनून राहिली. हॉटेलमध्ये ती स्वत: एसडीओ असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे ती बाहेर पडताना एटीएस ऑफिसात जास्त असल्याचे सांगायची. परंतु, अनेक प्रयत्न केल्यानंतर इन्स्टीट्यूटमध्ये तिला प्रवेश मिळाला नाही. वारंवार ती हॉटेल बदलत होती. अखेर तिने एलबीएस अकादमीत प्रवेश मिळवला. सगळ्यात आधी तिने एलबीएस अकादमीचे विश्वासू गार्ड देवसिंहला विश्वासात घेऊन त्याच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहू लागली.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी एक युवक डीओपीटी आणि यूपीएससीचे बनावट दस्ताऐवज तयार करून अकादमीत दाखल झाला होता. परंतु त्याचा काही दिवसातच पर्दाफाश झाला होता. रुबी देखील अशाचप्रकारे अकादमीत दाखल झाली होती. परंतु रुबीचे आयकार्ड (ओळख पत्र) तयार करण्‍यात आले नव्हते. एटीआय नैनीतालचे आयकार्ड ती दाखवायची, असे सूत्रांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर वाचा, पती आणि भावाच्या 'सरप्राइज'ने रूबीला आणले अडचणीत...