आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fake Note News In Marathi, Reserve Bank Of India

माजी गव्हर्नरची स्वाक्षरी असलेल्या छापल्या नोटा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवास - येथील बँक नोट प्रेस व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे येथील छापखान्यात चक्क रिझर्व्ह बँकेच्या माजी गव्हर्नरची स्वाक्षरी असलेल्या 270 दशलक्ष नोटा छापल्या गेल्या. आता या नोटांचे करायचे काय, हा प्रश्न असून आरबीआयने या नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे.

ही चूक दुरुस्त करण्यासाठी अधिकार्‍यांनी धडपड सुरू केली असली तरी माजी गव्हर्नर सुब्बाराव यांची स्वाक्षरी असलेल्या नोटा खपवायच्या कशा, हाच मुख्य प्रश्न आहे. दोन महिन्यांपूर्वी अशाच नोटांची एक कन्साइनमेंट जयपूरला पाठवण्यात आली होती.