आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fake Officer Ruby Chaudhary Arrested In Dehradun

आत्महत्येची धमकी दिल्यानंतर तोतया IAS रुबी चौधरीला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देहराडून - बनावट कागदपत्रांच्या आधारे लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अधिकारी प्रशिक्षण केंद्रात सहा महिने मुक्काम केलेल्या रुबी चौधरीला अटक करण्यात आली आहे. सीआयडीचे पोलिस आयुक्त शाहजहां अन्सारी यांच्या नेतृत्वातील विशेष तपास पथकाने शुक्रावारी दुपारी रुबी चौधरीला ताब्यात घेतले. अटक करण्याच्या आधी तिने धकमी दिली होती, की मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेल. त्याआधीच एसआयटीने तिला अटक केली आणि अज्ञात स्थळी नेले आहे. तिथे तिची सविस्तर चौकशी होणार आहे. तसेच संस्थेचे संचालक सौरभ जैन यांची देखील एसआयटीने चौकशी केली. रुबीने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे, की रुबीविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार.
मॅराथॉन चौकशी
शुक्रवारी दुपारी 12 वाजता दरम्यान, एसआयटीने रुबीला ताब्यात घेतले आणि लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय प्रशिक्षण केंद्रात घेऊन गेले. तिथे सौरब जैन देखील एसआयटीसोबत होते. सुरक्षा रक्षक आणि कर्मचार्‍यांकडे सलग सात तास चौकशी करण्यात आली. एसआयटी पथकाचे प्रमुक अन्सारी यांनी चौकशीबद्दल माध्यमांना माहिती देण्यास नकार दिला. ते म्हणाले, या प्रकरणाचा तपास अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल.

सह-संचालक एबीएसएएच्या बाजूने
एलबीएसएएचे अधिकारी आणि कर्मचारी प्रशासकीय उपचंसालक सौरभ जैन यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. एलबीएसएएचे सह-संचालक नरेला यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की रुबीच्या आरोपात तथ्य नाही. ते बिनबूडाचे आरोप आहे. ते म्हणाले, सुरक्षा रक्षाकांना जी घरे दिली जातात त्यामध्ये रुबी बेकायदेशीर राहात होती. अॅकॅडमीला रुबी बेकायदेशीर राहात असल्याचे कळाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आणि पोलिसांत तक्रार करण्यात आली.
पोलिसांवर आरोप
मसुरीला जाण्याआधी रुबी चौधरीने पुन्हा एकदा पोलिसांवर आरोप केला आहे. तिचे म्हणणे आहे, की पोलिस अॅकॅडमीच्या दबावात येऊन कारवाई करत आहेत. रुबीचा आरोपा आहे, की पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेतलेली नाही. ती म्हणाली, 'माझ्या जीवाला धोका असून मी मानसिक तणावात असतानाही पोलिस माझी मदत करत नाही आहे.'