आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर दिसणाऱ्या या \'पोलिसा\'ची पोलखोल, केलाय असा कारनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी संध्या तिवारी. - Divya Marathi
आरोपी संध्या तिवारी.
फैजाबाद - यूपीच्या फैजाबादमध्ये वाहन तपासणीदरम्यान पोलिसांनी एका बनावट महिला पोलिसाला अटक केली आहे. तरुणी पोलिस उपनिरीक्षकाच्या गणवेशात विनाहेल्मेट स्कूटीवरून जात होती. चेकिंगदरम्यान पोलिसांनी तिची कडक चौकशी केली असता तिची सर्व उत्तरे साफ खोटी ठरली. तिच्या घराची झडती घेतली असता घरातून पोलिसांची वर्दी, आयकार्ड, नेमप्लेट आदी सर्व हस्तगत करण्यात आले.
 
असे आहे प्रकरण...
- वास्तविक, 2 दिवसांपूर्वी यूपी पोलिसांचे महानिदेशकांनी निर्देश दिले होते की, पोलिस कर्मचाऱ्यांचेही हेल्मेट सक्तीने तपासले जावे.
- याच तपासणीदरम्यान फैजाबाद पोलिसांनी विनाहेल्मेट वर्दी घालून स्कूटीवरून जाणाऱ्या या तरुणीला थांबवले. तिच्याशी बोलताना पोलिसांना संशय आला.
- चौकशीत तिने स्वत:चे नाव संध्या तिवारी सांगून लखनऊच्या गोमतीनगरमध्ये पोस्टेड असल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता कळले की, या नावाची कोणतीही महिला पोलिसांत नाहीये. तिने सांगितलेला बॅच नंबरही खोटा निघाला. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
- कस्टडीत मग तिने स्वत:चे नाव संध्या तिवारी असून गोंडा जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. फैजाबादमध्ये पोलिस अधिकारी बनून किरायाच्या घरात राहत असल्याचेही सांगितले.
- तिच्या घराची झडती घेण्यात आली तेव्हा घरातून दोन पोलिस गणवेश, संध्या तिवारी आणि रुक्मिणी तिवारी नावाच्या 2 नेमप्लेट, 2 बनावट आयकार्ड आणि पोलिसांशी निगडित दस्तऐवज, पोलिस स्टेशनमध्ये वापरली जाणारी जनरल डायरी हस्तगत करण्यात आली.
- तरुणीने सांगितल्यानुसार, तिला पोलिस बनवण्याची आवड होती. म्हणूनच तिने गणवेश शिवून घेतला अन् शौक म्हणून ते घालत होती. परंतु, पोलिस अजून तपास करत आहेत की तिने महिला पोलिस बनून लोकांची फसवणूक तर केली नाहीये ना! पोलिस सूत्रांनुसार, फेसबुकवरही तिने पोलिसांच्या गणवेशातील आपले अनेक फोटो टाकलेले आहेत तसेच एका अंडर ट्रेनी पोलिस निरीक्षकाला प्रेमजाळात फसवत होती.
 
काय म्हणतात पोलिस अधिकारी?
- फैजाबादचे एएसपी विक्रांत वीर म्हणाले, गस्तीदरम्यान पोलिस कर्मचारी चेकिंग करत असताना स्कूटीवर विनाहेल्मेट आणि पोलिसी गणवेशात ही तरुणी आढळली.
- तिची चौकशी केली असता तिला व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत. यादरम्यान कळले तिचे नाव संध्या तिवारी असून तिने अवैध रीतीने पोलिसांची वर्दी घातलेली आहे. तिच्या जवळून पोलिस वर्दी, एक स्टॅम्प, आयकार्ड जप्त करण्यात आले असून आरोप तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...