आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टाटा-अंबानींपेक्षा श्रीमंत होता हा माणूस, भारत सरकारला दिले होते 5000 किलो सोने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निझाम उस्मान अली खान आपल्या पत्नींसह. - Divya Marathi
निझाम उस्मान अली खान आपल्या पत्नींसह.

हैदराबाद - देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती भलेही आज मुकेश अंबानी आहेत, परंतु भारतात आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून हैदराबादचा शेवटचा निझाम उस्मान अली खान यांचे नाव येते. ब्रिटिश वृत्तपंत्र "द इंडिपेंडंट"मधील वृत्तानुसार हैदराबादच्या निझामाची (1886 ते 1967)  एकूण संपत्ती 236 अब्ज डॉलर होती, तर आज मुकेश अंबानी यांची संपत्ती 44.8 अब्ज डॉलर (तब्बल 2926 अब्ज रुपये) आहे. निझामाचे 80 वर्षे वयात 1967 मध्ये निधन झाले होते.

(अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प हैदराबादच्या फलकनुमा पॅलेसमध्ये डिनर करणार आहे, यानिमित्ताने आम्ही तुम्हाला हैदराबादच्या निझामाबाबत सांगत आहोत)

 

भारत सरकारला दिले होते 5000 किलो सोने
- चीनशी 1965च्या युद्धात भारत आर्थिक बाबतीत खूप कमजोर होता.
- अशा वेळी तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी या धोक्याचा सामना करण्यासाठी देशातील मोठमोठ्या व्यक्तींना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.
- तेव्हा निझाम मीर उस्मान अलीने भारत सरकारला 5 टन (5 हजार किलो)  सोने राष्ट्रीय संरक्षण निधीत दिला होता.
- आज या सोन्याची किंमत 1600 कोटींहून अधिक आहे.

 

1340 कोटी रुपयांचा पेपरवट वापरायचा निझाम
- असे म्हटले जाते की, निझाम 20 कोटी डॉलर (1340 कोटी रुपये) किमतीचा डायमंडचा वापर पेपरवेट म्हणून करायचे.
- मोती आणि घोड्यांच्या त्यांच्या छंदाबाबत आजही हैदराबादेत अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत.
- हैदराबादच्या निझामाचे शासन मुघल निझामशाहीम्हणून 31 जुलै 1720 पासून सुरू झाले होते.
- याचा पाया मीर कमारुद्दीन खानने ठेवला होता. उस्मान अली खान या राजघराण्याचे शेवटचे निझाम होते.

 

निझामाने केली होती अनेक लग्ने
- निझाम आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होता. निझामाला किती पत्नी आणि मुले होती, याचा अंदाज लावणे कठीण आहे.
- रिपोर्ट्सनुसार, निझामाचा ज्या वेळी मृत्यू झाला, तोपर्यंत डझनभर पत्नींपासून त्यांना 86 मुले होती.

 

स्वत:वर खूप कमी खर्च करायचा निझाम
- असे म्हटले जाते की, हैदराबादचा निझाम श्रीमंत असण्याबरोबरच खूप कंजूषही होता.
- निझामाने आपल्या जीवनात 35 वर्षांपर्यंत एकच टोपी घातली आणि ते आपले कपडेही कधीच प्रेस करून घेत नव्हते.
- ते पत्र्याच्या थाळीत जेवण करायचे आणि खूपच स्वस्त सिगारेट ओढायचे.
- एवढेच नाही, निझामाने कधीच सिगारेटचे पूर्ण पाकीट खरेदी करून ओढले नाही.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...