आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fallen Jawan's Wife Turns Lieutenant News In Marathi

शहीद जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - डेहराडूनच्या महिला अधिकारी प्रिया सेमवाल यांना शनिवारी भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळाली. त्यांचे पतीही भारतीय लष्करात जवान होते. अरुणाचल प्रदेशात घुसखोरीची प्रयत्न हाणून पाडताना ते शहीद झाले. त्यानंतर चेन्नईच्या ऑफिसर्स प्रशिक्षण अकादमीत पासिंग आऊट परेडमध्ये प्रिया सेमवाल सहभागी झाल्या. शॉर्ट सर्व्हिस कमिशनने इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल इंजिनअरिंगमध्ये (ईएमई) प्रिया यांना नेमणूक दिली. शहीद जवानाची पत्नी भारतीय लष्करी अधिकारी होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

प्रिया यांचे पती अमित शर्मा हे राजपूत रेजिमेंटमध्ये नायक होते. अरुणाचल प्रदेशात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना दोन वर्षांपूर्वी अमित शहीद झाले. प्रिया आणि अरुण यांचा विवाह 2006 मध्ये झाला. त्या वेळी त्या पदवीचे पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होत्या.

लग्नानंतर पुढील शिक्षणासाठी पतीने त्यांना कायम प्रोत्साहन दिले. अमित यांचे कमांडिंग अधिकारी राहिलेल्या कर्नल अरुण अग्रवाल प्रियाच्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आवर्जून चेन्नईला आले होते. त्यांनी सांगितले की, अमितची अशी इच्छा होती की पदवी प्राप्त केल्यानंतर त्याच्या पत्नीने लष्करात अधिकारी व्हावे, परंतु ही इच्छा तो शहीद झाल्यानंतर पूर्ण होईल, असे वाटले नव्हते. अमितच्या जाण्यानंतर प्रियाचे कुटुंब तिला लष्करात येऊ देण्याविषयी उत्सुक नव्हते, परंतु प्रियानेच तसा आग्रह धरला.

मूळच्या डेहराडूनच्या असलेल्या प्रियाच्या कुटुंबीयांना असे वाटत होते की, तिने तिच्या मुलीच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे व त्यासाठी तिने डेहराडूनमध्येच राहावे. परंतु प्रियाने टीचिंगमध्ये पदवी आणि गणितात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरही पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी लष्करात भरती होण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले. चेन्नईमध्ये झालेल्या पासिंग आऊट परेड समारंभासाठी प्रियाच्या आई विशाखा सेमवाल व भाऊ प्रवेश हेही आवर्जून उपस्थित होते. आम्हाला प्रियाचा अभिमान असल्याचे त्यांनी एका सुरात सांगितले. तिच्याकडे पाहून महिलांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.