आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अघोरीः शंकर प्रगटले नाही म्‍हणून संपूर्ण कुटुंबाने खाल्‍ले विष, पाहा व्हिडिओ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंधश्रद्धेपोटी एकाच कुटुंबातील 8 जणांनी विष घेऊन आत्‍महत्‍या करण्‍याचा खळबळजनक प्रकार राजस्‍थानात उघडकीस आला आहे. एवढेच नव्‍हे तर संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्‍यात आले.

अधश्रद्धेला बळी पडलेले हे कुटुंब कंचन सिंह राजपूत यांचे आहे. ते स्‍वतः तंत्र-मंत्रात विश्‍वास ठेवायचे. सोमवारी रात्री त्‍यांनी कुटुंबियांसह शंकराची आराधना केली. शंकराने प्रत्‍यक्ष साक्षात्‍कार द्यावा, यासाठी राजपूत यांनी घरी यज्ञ केला. शंकराच्‍या प्रतिमेला रक्ताने अभिषेक केला. रक्ताचा टिका लावून यज्ञात अनेक वस्‍तुंची आहुती देण्‍यात आली. परंतु, तरीही शंकराने दर्शन दिले नाही. त्‍यामुळे विषयुक्त लाडू खाऊन संपूर्ण कुटुं‍बाने आत्‍महत्‍या केली. हेतू एकच. शंकराने प्रत्‍यक्ष दर्शन दिले नाही. त्‍यामुळे आपणच त्‍याच्‍याकडे जाऊ. कंचन सिंह राजपूत (45), त्‍याची पत्‍नी नीलम (40), मुलगी ड्रीमी (16), मुलगा प्रद्युम्न (11) आणि भाऊ दिप सिंह (40) यांचा या अघोरी कृत्‍यात मृत्‍यू झाला.

या घटनेचा व्हिडिओ या बातमीत दिला आहे...