आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Family Dispute Case Growth At India In Last 10 Years

चिंताजनक: दशकभरात देशात कौटुंबिक हिंसा, महिला अत्याचारांत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुअनंतपुरम- देशात गेल्या ११ वर्षांत महिला अत्याचाराच्या घटना वेगाने वाढल्या आहेत. २००१ च्या तुलनेत २०१४ मध्ये अशा घटना दुपटीपेक्षा जास्त वाढल्या आहेत. त्याचबरोबर विवाहित महिलांच्या शोषणाच्या घटनांमध्ये अडीचपट वाढ झाली आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या "भारतात महिलांची स्थिती' या अहवालात हा खुलासा झाला आहे.

तिरुअनंतपुरम येथे लैंगिक समतेवर आंतरराष्ट्रीय संमेलन भरले आहे. त्यात याबाबत अहवाल जारी करण्यात आला आहे. यानुसार २००१ मध्ये देशात अत्याचाराच्या १६,०७५ घटना घडल्या होत्या. २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन हा आकडा ३६,७३५ पर्यंत गेला आहे, तर विवाहित महिलांच्या शोषणाच्या ४९,१७० घटना घडल्या होत्या. त्या वाढून १,२२,८७७ वर गेल्या आहेत. हा अहवाल तयार करणाऱ्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष पाम राजपूत यांनी सांगितले की, अहवालाचा उद्देश यासंदर्भातील धोरणांच्या त्रुटींमध्ये हस्तक्षेप करणे तसेच त्यात योग्य त्या बदलांची शिफारस करणे हा आहे. महिलांच्या आर्थिक, कायदा, राजकारण, शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक गरजा विचारात घेऊन त्यात सूचना करण्यात येणार आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे आरोग्याच्या बाबतीत १४२ देशांच्या यादीत भारत १४१ व्या स्थानी म्हणजे तळातून दुसरा आहे.

महिला व मुलांसाठी स्वतंत्र बजेट असावे
राजपूत यांनी सांगितले की, आर्थिक विकास व शिक्षणाचा स्तर वाढूनदेखील महिलांना त्यांच्या मर्जीनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य खूप कमी आहे. संमेलनात कुपोषण, लिंगभेद महिला व मुलींविरोधातील हिंसाचारासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरही चर्चा झाली. त्यानंतर समितीने महिला सशक्तीकरणासाठी महिला व मुलांसाठी स्वतंत्र बजेट असले पाहिजे, अशी शिफारस केली आहे.