आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
थिरुवनंतपुरम - आपल्या मुलाची मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून अनेक राजकीय नेते जंगजंग पछाडतात, परंतु केरळात आपल्या मुलाची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी पित्याने कंबर कसली आहे. वनमंत्री के. बी. गणेशकुमार यांच्याविरोधात त्यांचे वडील आणि केसी-बी पक्षाचे नेते आर. बालकृष्णन पिल्लई यांनी बंडाचा झेंडा उभारला असून वनमंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे गणेशकुमार हे केसी-बी पक्षाचे विधिमंडळातील एकमेव आमदार आहेत.
काँग्रेस प्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) ची येत्या 2 एप्रिल रोजी बैठक होत आहे. या बैठकीत पिल्लई मुलाच्या हकालपट्टीचा मुद्दा उचलणार आहेत. आपला मुलगा कार्यकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून पक्षाच्या धोरणाविरोधात काम करीत असल्याचा पिल्लई यांचा आरोप आहे. आपल्या मुलास मंत्रिमंडळातून वगळण्यासाठी पिल्लई यांनी मुख्यमंत्री ओमान चंडी, यूडीएफचे निमंत्रक पी. पी. थांकचान यांना पत्रही लिहिले आहे. 140 सदस्यांच्या विधानसभेत यूडीएफला काठावरचे बहुमत आहे. यूडीएफ चे 73 आमदार असून आघाडीसाठी प्रत्येक पक्षाचा एकेक आमदार अत्यंत महत्त्वाचा आहे. पिता-पुत्राच्या भांडणात मुख्यमंत्री चंडी यांची मात्र गोची झाली आहे. गुरुवारी आजारी वडिलांच्या प्रकृ तीची विचारपूस करून बाहेर पडताच गणेशकुमार यांनी पक्षातील वाद मिटल्याचे सांगितले. मुळात वादच नव्हता, मग वाद मिटवण्याचा प्रश्नच नाही, असा दावा त्यांनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.