आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Family Members Mourn Demise Of Lt Col Niranjan As Mortal Remains Arrive At Bengaluru Residence

पठाणकोट हल्ला: सैरभैर निरागस चिमुरडीला आता आजोबांचाच दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट/ नवी दिल्ली- पठाणकोट हवाई दल तळावरील हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी सुरक्षा दलांनी आणखी दोन अतिरेक्यांचा खात्मा केला. मात्र शोधमोहीम अजूनही सुरूच आहे. दरम्यान, हल्ल्यात जैश-ए-महंमदच्या अतिरेक्यांचा हात असल्याचे पुरावे मिळाले असून, भारताने पाकला जैशवर कारवाईची सूचना केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक घेतली. त्यात पठाणकोट हल्ल्याबरोबरच अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्याबाबतही चर्चा झाली. चार अतिरेक्यांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित दोघांचे मृतदेहही लवकरच मिळतील. जेथे अतिरेकी घुसले होते, तेथे सुरक्षा दलांनी त्यांना घेरले आहे. हवाई दलाची सर्व संपत्ती सुरक्षित आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर सांगितले.

एनएसजीचे महासंचालक मेजर जनरल दुष्यंत सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, कोम्बिंग आणि शोधमोहीम अजून सुरू आहे. जोपर्यंत हवाई दलाचा तळ सुरक्षित आहे, या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचणार नाही, तोपर्यंत ही मोहीम सुरूच राहील.

त्यांच्यासोबत एअर कमोडोर जे. एस. धमून आणि ब्रिगेडियर अनुपिंगर सिंहही उपस्थित होते.
तुम्ही चार जण मागे का राहिलात? : पाक हँडलरने दहशतवाद्यांना झापले
हवाईदल तळावर हल्ल्यासाठी दहशतवादी चार दोनच्या गटाने आले होते. दोन दहशतवादी तर पोलिस अधीक्षक सलविंदर सिंह, त्यांचे सराफा व्यापारी मित्र राजेश वर्मांचे ३१ डिसेंबरला अपहरण होण्यापूर्वीच तळावर घुसले होते. उर्वरित चौघांनी अपहरण केले होते. हे चौघे पाकिस्तानात बसलेल्या हँडलरकडून निर्देश घेत होते. इतर दोघे हल्ल्यासाठी लक्ष्यावर पोहोचले आहेत. मग तुम्ही चार जण मागे का राहिलात, असे हँडलर त्यांना विचारत होता. तेव्हा या अतिरेक्यांनी ठिकठिकाणच्या बॅरिकेड्समुळे आम्हाला उशीर झाला, असे त्यांनी हँडलरला सांगितल्याचा दावा राजेश वर्मा यांनी केला.
हवाई दलाच्या दोनमजली निवासी इमारतीत लपले होते दहशतवादी
चकमकीतमारल्या गेलेल्या दहशतवाद्यांबाबत सोमवारपासूनच परस्परविरोधी माहिती येत होती. सोमवारी पठाणकोटच्या हवाई दल तळावरील दोनमजली निवासी इमारतीमध्ये प्रचंड शक्तिशाली स्फोट झाला. याच इमारतीत दोन्ही दहशतवादी लपून बसले होते. हवाई दलाच्या मते, या इमारतीत हवाई दलाचे जवान राहत होते. हवाई दल तळाचा परिसर खूपच मोठा आहे. येथे हवाई दलाची सामरिक सामग्री ठेवण्यात आली आहे. शिवाय हवाई दलाचे अधिकारी जवानांची कुटुंबेही तेथेच राहतात. तेथे शाळाही आहे. ते एक प्रकारचे मिनी शहरच आहे.
बंगळुरू | पठाणकोटहल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजनकुमार यांच्या पार्थिवावर सोमवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुमार यांच्या सैरभैर झालेल्या चिमुरड्या कन्येला दिलासा देताना त्यांचे शोकविव्हल वडील. कुमार हे एनएसजीच्या बॉम्बशोधक नाशक पथकाचे सदस्य होते. हवाई दल तळावर दहशतवाद्यांनी पेरलेला बॉम्ब निकामी करताना रविवारी त्यांना वीरगती प्राप्त झाली होती.
बातम्या आणखी आहेत...