आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Family Of Five \'jump\' To Death Into Yamuna River

यमुना नदीत उडी घेऊन शिक्षकाने कुटुंबासह संपविली जीवनयात्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा- यमुना नदीत उडी घेऊन एका शिक्षकाने पत्नी आणि 3 चिमुकल्‍यांसह जीवनयात्रा संपविल्‍याची खळबळजनक घटना मथुरा येथे घडली.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अमर सिंह (35), त्‍याची पत्नी मीना (30), मुली एकता (8), अनुपमा (5) आणि अदिती (3) यांनी सोमवारी शेरगढ पुलावरुन नदीत उडी घेतली. अमर सिंह हे प्रा‍थमिक शाळेत शिक्षक होते. ते मुळचे हरियाणा येथील पलवल जिल्‍ह्यातील रहिवासी होते. त्‍यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झाले नाही. परंतु, कुटुंबासह आत्‍महत्‍या करण्‍यापूर्वी त्‍यांनी नातेवाईक आणि एका मित्राला दूरध्‍वनीवरुन याबाबत कल्‍पना दिली होती. मानसिकरित्‍या खचल्‍याचे त्‍यांनी या सर्वांना सांगितले होते. परंतु, कशामुळे ते खचले होते, याचा तपास सुरु आहे.

घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर त्‍यांचे नातेवाईक घटनास्‍थळी पोहोचले. पाचही जणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. मृतदेहांचा शोध घेण्‍यासाठी पोहणा-यांची मदत घेण्‍यात आली होती. परंतु, त्‍यांना अपयश्‍ा आले.