आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमला गादी देणाऱ्या गुरू शाह सतनाम यांचे कुटुंब 15 वर्षांपासून आहे डेरापासून लांब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरसा - शाही जीवन जगणाऱ्या राम रहीमचे गुरू शाह सतनाम महाराज यांचे कुटुंब सध्या डेरा आणि या सर्व प्रकरणापासून दूर आहे. सिरसा जिल्हा मुख्यालयापासून 40 किलोमीटर अंतरावरील जलालआना गावात त्यांचे अत्यंत साधे घर आहे.
 
सतनाम महाराज यांचे दोन नातू शेती व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे कुटुंब संयम, नियम आणि डेराच्या कायद्यानुसार अत्यंत साधे जीवन जगते. शाह सतनाम महाराजचा नातू भूपेंद्र सिंहशी दैनिक भास्करने चर्चा केली. त्यांनी सांगितले की, सुमारे 2002 नंतर डेरामध्ये येणे जाणे शक्य होत नाही. 2002 मध्येच राम रहीमवर अत्याचाराचे आरोप झाले. तेव्हापासूनच सतनाम यांच्या कुटुंबीयांनी डेराशी दुरावा केला.  
 
आणखी काय म्हणाले भूपेंद्र.. 
- शाह सतनामजी महाराज आमचे आजोबा होते. ते अत्यंत सात्विक संत होते. त्यांनी राम रहीमला गादी सोपवली तेव्हा मी फक्त 16 वर्षांचा होतो. त्या दिवशी मी डेऱ्यात जाऊ शकलो नव्हतो. 
- आजोबांच्या मृत्यूनंतर डेऱ्याची प्रगती फार वेगाने झाली. पण आम्ही क्वचितच डेऱ्यात जायचो, नंतर तेही पूर्णपणे बंद झाले. 
- कोणाशी काही वादही नाही. पण शाह सतनाम यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार आम्ही  साधेपणाने जगतो. 

डेऱ्याच्या फायद्या-तोट्याशी संबंध नाही 
- भूपेंद्र म्हणतात, डेराचे स्वतंत्र नियम आहेत. त्यांची जबाबदारी आहे. त्यांचा नफा तोटा याच्याशी आमची काहीही संबंध नाही. गादीवर कोणी बसावे याच्याशीही आमचा संबंध नाही. 
- परंपरांचे पालन होते किंवा नाही, याबाबत तरी आम्ही का बोलावे. आमचा आता काहीही संबंध राहिला नाही. पण समाजात शांतता असायला हवी. प्राण कोणाचेही जायला नको. डेराप्रमुखांवर आरोप असतील तर त्यांनी उत्तर द्यावे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS.. 
 
बातम्या आणखी आहेत...