आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुदासपूर : शहीदाच्या पत्नीची अट - मुलाला SP, मुलींना तहसीलदार करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुदासपूर - पंजाबातील गुरुदासपूर येथे सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधीक्षक (डिटेक्टिव्ह) बलजीतसिंग यांच्या अंत्यसंस्काराआधी त्यांच्या पत्नीने पंजाब पोलिसांसमोर अनेक मागण्या ठेवल्या आहेत. बलजीतसिंग यांच्या पत्नी कुलवंत कौर यांनी त्यांच्या मुलाला पोलिस अधीक्षक आणि मुलींना तहसीलदार पदी नियुक्तीचे आदेश देण्याची मागणी केली आहे. त्यानंतरच पतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील अशी अट त्यांनी ठेवली आहे.
कुलवंत कौर म्हणाल्या, जेव्हा माझे सासरे शहीद झाले होते तेव्हा माझ्या पतीला दोन वर्षे नोकरीसाठी संघर्ष करावा लागला होता. कुलवंत यांनी आरोप केला, की पंजाब सरकारने पोलिसांना अत्याधुनिक शस्त्र दिले नाही.

कुटुंबात पत्नी आणि तीन मुले
शहीद बलजीत सिंग यांच्या कुटुंबात पत्नी कुलवंत कौर, एक मुलगा मनिंदरसिंग (24) आणि दोन मुली परमिंदर कौर (22) आणि रविंदर कौर (20) आहे. मनिंदर बी टेक करत आहे, तर परमिंदर पदवी शिक्षण घेत आहे आणि रविंदर कौर बीडीएस करत आहे. बलजीतसिंग उत्कृष्ट हॉकीपटू होते. ते मिडफिल्डर म्हणून खेळत होते. त्यांनी 1993 मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
दीनानगरमध्‍ये झाला पुन्‍हा स्‍फोट
दीनानगर पोलीस ठाण्याजवळ आज पुन्हा स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटात कुणीही जखमी अथवा मृत्युमुखी पडल्याचे वृत्त नाही. दरम्यान, आवाजावरून हा ग्रेनेडचा स्फोट असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, पाकिस्तानातून आले होते दहशतवादी