रायपूर- माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक चॅनलची स्पर्धा लागलेली आहे. आज प्रत्येकाच्या घरी
सोनी, स्टार प्लस, यासारखी असंख्य चॅनल आहेत. डीटीएचा प्रचार आणि प्रचार गावागावात झाला आहे. टीव्ही पाहताना प्रत्येकाच्या हतामध्ये रिमोट असल्यामुळे प्रत्येक दहा मिनिटाला चॅनल बदलणा-यांची संख्या कमी नाही. जागतिकिकरणाच्या अगोदर प्रसारमाध्यमांचा प्रभाव आजच्या एवढा नव्हता. 20 वर्षापूर्वी टीव्ही हा खूप कमी घरामध्ये पाहिला जात असे. त्या काळात आजच्या सारखे पर्याय नसल्यामुळे डीडी-1 हे एकमेव चॅनल पाहिले जात असे.आज हे चॅनल पाहणा-यांची संख्या मोठ्याप्रमाणात घटली आहे.
मात्र रायगड जिल्ह्यामध्ये एक घर असे आहे, ज्या घरातील सर्व व्यक्ति एकमेव डीडी-1 हे चॅनल पाहतात. यांना टीव्ही घेणे शक्य नाही, अशातला हा प्रकार नाही. आजच्या टीव्हीवरील जाहिराती आणि अश्लील कार्यक्रम पाहूण घरातील वातवरण बिघडू नये हा यामागचा उद्देश आहे, असे या कुटुंबातील व्यक्तिंचे म्हणने आहे. आज प्रत्येक घरातील व्यक्तिंना आपल्या टीव्हीवर सोनी, स्टार प्लस, जी टीव्ही, सब टीव्ही यासाखी असंख्य चांनल दिसावीत अशी अपेक्षा असते. रायगडच्या इंदिरा नगर कुटुंबातील व्यक्तिंनी मात्र हा मोह टाळला आहे.
केबल कनेक्शन बंद केले
मनोरंजन होण्यासाठी दुर्गा प्रसाद यांच्या लहान मुलाने केबलचे कनेक्शन घेतले. मात्र या चॅनलवरचे कार्यक्रम कुटुंबासोबत पाहण्यासारखे नाहीत हे लक्षात आल्यानंतर केबल बंद करण्यात आले.
रंगोली हा कार्यक्रम आजही आवडतो
दुर्गा प्रसाद यांच्या परिवारला आजही डीडी-1 या चॅनलवरील रंगोली आणि छायागित सारखे कार्यक्रम पाहिले जातात. या कार्यक्रमात नविन आणि जूणे गित दाखवली जातात.
दुरदर्शन;
भारतामध्ये दुरदर्शनची सुरूवात 15 सप्टेंबर 1969 मेध्य झाली. दुरदर्शनच्या अंतर्गत देशभरामध्ये विविध भाषेमधून अनेक चॅनल पाहिली जातात. या चॅनलवर केंद्रसरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येते. याबरोबरच मनोरंजन आणि शिक्षणासंदर्भात विविध कार्यक्रम दाखवले जातात. केबल चॅनल सुरू होण्याअगोदर माहिती मिळवण्याचे आणि मनोरंजनाचे डीडी- 1 हे एकमेव चॅनल होते.