आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाराणसी ते पणजी, जाणून घ्या देशातील 7 शहरांमधील प्रसिद्ध दीपोत्सवाबाबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीबी डिजिटल नेटवर्क - वाराणसीचे घाट सजले आहेत. हरिद्वारच्या हरकी पौडीवर 500 वर्षे जुनी परंपरा आजही कायम आहे. कृष्णाची मथुरा नगरीही सजली आहे. तर गोव्यात नरकासुराच्या गर्जना ऐकायला मिळत आहेत. कोलकात्यामध्येही काली मातेचे 60 हजार पेंडॉल झगमगत आहेत. देशभरातील अशाच 7 निवडक शहरांतील दिवाळी आम्ही खास घेऊन आलो आहोत divyamarathi.com च्या वाचकांसाठी...

...पण मोठ्या शहरांच्या झगमगाटामध्ये तुम्ही हरवण्याआधी आम्ही तुम्हाला सार्थक दिवाळी कशी साजरी करावी हे सांगू इच्छितो...
> देशात 50 लाख लोक दरवर्षी रक्तदान करतात. तुम्हीही त्यापैकी एक असू शकता. दरवर्षी 30 लाख युनिट रक्ताची कमतरता भासते. ती दूर करण्यासाठी केवळ 2% नागरिक दाते म्हणून हवे आहेत.
> देशात जेव्हा रस्त्यांवर अपघात होतात तेव्हा 12% लोक जखमींची मदत करायला लगेचच सरसावतात. तुम्हीही अशा निवडक लोकांमघ्ये सहभागी होऊ शकतात. तत्काळ मदतीतून तासाला होणाऱ्या 16 पैकी 14 मृत्यू रोखले जाऊ शकतात.
> गेल्या 365 दिवसांमध्ये सुमारे 4000 लोकांनी अनाथ मुलांना दत्तक घेतले. तुम्हीही अशा मुलांसाठी काही करू शकता.
> जगात ‘वन-डे, वन मील' अभियान सुरू आहे. लोक एक वेळच्या जेवणाचे पैसे याअभियानाला देत आहेत. असे 19 कोटी लोक आपल्या देशातही आहेत. तुम्ही त्यांची मदत करू शकता.

चला तर मग, देशातील या महत्त्वाच्या सात शहरांमध्ये साजरा होणाऱ्या दिवाळीचा आनंद घेऊयात. दैनिक भास्करचे फोटो जर्नालिस्ट ओ.पी. सोनी तुमच्यासाठी हरिद्वारच्या हरकी पौडीचा खास फोटो घेऊन आले आहेत. वाराणसीहून अमित मुखर्जी घाटांवर होणाऱ्या विहंगम आरतीचा लाइव्ह रिपोर्ट, मथुरेतून समय प्रकाश जयपूरहून आलोक खंडेलवाल, पणजीहून उपमिता वाजपेयी, मुंबईतून विनोद यादव आणि कोलकात्याहून शहरोज कमर यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

1. हरिद्वार : 500 वर्षांची परंपरा
दिवाळीला हरिद्वारच्या हरकी पौडी येथे 500 वर्षांपासून सुरू दीपदानाची परंपरा सुरू आहे. मंगळवारी रात्री येथे भाविक मोठ्या संख्येने जमले होते. दीपदान हे इतरांसाठी केलेल्या चांगल्या प्रार्थनेचे प्रतिक असते. हा एक छोटासा प्रयत्न वाटतो. पण त्यामागणी भावना मोठी आहे. कारण जेव्हा दिवे पाण्यात सोडले जातात तेव्हा स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी प्रार्थना केली जाते. (फोटो वरील स्लाइडवर)
पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर 6 शहरांतील दिवाळीबाबत...

बातम्या आणखी आहेत...