आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मी नेहमी तयार असतो स्वीटी', यांनी इंदिरा गांधींच्या प्रश्‍नाला दिले होते असे उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - 1971 च्या पाकिस्तान युध्‍दाचे हिरो सॅम मानेकशॉ यांची 27 जून रोजी 7 वी पुण्‍यतिथी आहे. सॅम यांना 71 च्या लढाईनंतर त्यांच्या कामगिरीसाठी पहिले फील्ड मार्शल ही पदवी दिली गेली होती. लष्‍करात सर्वात चर्चिल गेले मानेकशॉ यांच्याविषयी अनेक किस्से सांगितले जातात. आपले काम व शिस्तीसाठी ओळखले जाणारे सॅम विनोद व आपल्या हाजिर जवाबसाठी ही प्रसिध्‍द होते. divyamarathi.com सॅम यांच्या पुण्‍यतिथी निमित्त काही असेच त्यांचे हाजिर जवाब किस्से सांगणार आहे. आयएमएच्या पाहिल्या बॅचचे विद्यार्थी होते सॅम...
- सॅम मानेकशॉ यांचे पूर्ण नाव सॅम होर्मूसजी फ्रेमजी जमशेजदजी मानेकशॉ असे होते. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1914 मध्‍ये अमृतसरमध्‍ये एका पारशी कुटुंबात झाला होता.
- त्यांचे कुटुंब गुजरातमधील वलसाड शहरातून पंजाबमध्‍ये आले होते. मानेकशॉ यांचे सुरुवातीचे शिक्षण अमृतसरमध्‍ये झाले व नंतर ते नैनीतालच्या शेरवूड कॉलेजमध्‍ये पुढील शिक्षणासाठी दाखल झाले.
- ते डेहराडूनच्या इंडियन मिलिट्री अॅकेडमीचे पहिल्या बॅचमध्‍ये निवडले गेलेल्या 40 विद्यार्थ्‍यांपैकी एक होते.
सात गोळ्या लागल्या होत्या, डॉक्टरने उपचार करायला नकार दिला
- सॅम यांना दुस-या महायुध्‍दासाठी म्यानमारमध्‍ये कमांड सांभाळण्‍यासाठी पाठवले. येथे फ्रंटियर फोर्स रेजिमेंटचे कॅप्टन म्हणून जपानींशी दोन हात करताना ते गंभीर जखमी झाले होते.
- त्यांना सात गोळ्या लागल्या होत्या. सॅमचे गंभीर स्थिती पाहून डॉक्‍टरने उपचार करायला नकार दिला.
- हे पाहून गुरखाने डॉक्टरवर रायफल रोखले व जोराने म्हणाला, माझ्या साहेबांचा आदेश आहे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत लढत रहायचे.
- जर तुम्ही त्यांच्यावर उपचार न केल्यास तुझ्यावर गोळ्या झाडेल. जीव जाणार या भीतीने डॉक्टरने सॅम यांच्यावर उपचार सुरु केले व त्यांचा जीव वाचला.
पुढील स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमधून वाचा सॅम मानेकशॉ यांच्या काही हाजिर जवाबी किस्से...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)