आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farhan Akhtar In Jaipur Mairathan With People Rajasthan

PICS: फरहान अख्तरने केली जयपूर मॅरेथॉनची सुरवात, 117 वर्षांचा वृद्धही झाला सहभागी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारची सकाळ जयपूरच्या लोकांसाठी विशेष ठरली निमित्त होते जयपूर अंबूजा मॅरेथॉन पावर्ड बाय दैनिक भास्कर. या मॅरेथॉनमध्ये सात वर्षीय हर्षितापासून 117 वर्षीय धर्मपाल सिंहांपर्यंत सर्वांचाच उत्साह अलैकिक होता. शहरातील शाळा कॉलेजचे विद्यार्थी, डॉक्टरस, गृहिणीपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगाटातील लोक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. मुंबई, दिल्लीसोबतच परदेशी पर्यटकांनीदेखील या मॅरेथॉनला हजेरी लावली. फरहान अख्तर या बॉलिवूड कलाकाराने मरेथॉनला हिरवा झेंडा दाखवत मॅरेथॉनची सुरवात केली.
सकाळी सहा वाजता रामनिवास गार्डनच्या दक्षिणगेटपासून सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये 2832 अ‍ॅथलीटस, 87 भारतीय उच्चभ्रु लोक आणि 28 परदेशी उच्चभ्रु लोक सहभागी झाले होते. सहा किमीच्या या शर्यत 48 हजार ड्रीम रनर्सनी भाग घेतला. भारतीयांसोबतच 20 देशातील जवळजवळ 50 हजार लोक या शर्यतीत उतरले होते.
त्याच्या जिद्दिला सलाम, शारिरीक व्यांगावर मात करत त्याने पाहिले पॅरालिंपिक जिंकण्याचे स्वप्न
पाच वर्षापूर्वी फरिदाबाद येथे एका रोड आपघातात दिल्लीचा रहिवासी हिमांशु कुमार याचा डावा पाय निकामी झाला. दोन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. अशा अवस्थेतही हिमांशूचे मनोधर्य थोडेही कमी झालेले नाही. 20 वर्षीय हिमांशू हिमतीच्या जोरावर 2016 ला रशियातील रियोमध्ये होणा-या पॅरालिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे. तुम्ही मनात एखादी गोष्ट करण्याचे ठरवले तर कुठलाच अडथळा तुम्हाला धेय प्रप्तीपासून रोखू शकत नाही असे हिमांशूचे म्हणणे आहे.
समस्येतून मार्ग काढण्याचा विचार करणे हिच यशाची पहिली पायरी असलेयाचे हिमांशू सांगतो. पॅरालिंपिकमध्ये भाग घेण्यासाठी तो रोज 2-3 तास जिममध्ये व्ययाम करतो. या सोबतच हिमांशू ग्राफिक डिसाइनर आहे. हिमांशूला देशासाठी असे काम करयचे आहे, की ज्यानंतर पाय नाही म्हणूण लोक हिंमत हारणार नाहित.
कॅन्सर ग्रसतांनाचीही तो मदत करतो
दिल्लीतील कॅन्सर सोसाइटी आणि इतर सोवाभावी संस्थांच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त लोकांसाठी पैसे गोळा करण्याचे काम करतो.
काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत धावण्याची इच्छा
या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी मेरठहून आलेल्या 117 वर्षीय धर्मपाल सिंह यांची कस्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत धावण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना स्पांसरची गरज आहे. मुंबईमध्ये 2 तास 28 मिनिटांमध्ये 21 किलोमिटर तर 55 मिनिटांमध्ये 11 किलोमिटर धावण्याचा त्यांनी रोकॉड बनवला आहे. ते मासाहार घेत नसल्याचे त्यांचा सेवक संदीप पांडे सांगतो. तबेत चांगली राहण्यासाठी ते रोज बेलपत्र, तुलसी, धने, लिंबू आणि काही औषधी वनस्पतींपासून बनवलेली चटणी खातात.
पुढील स्लाइडवर पाहा मॅरेथॉनचे काही खास फोटो...