आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वय ६५ वर्षे, हार्टचे रुग्ण; पण १३ वर्षांपासून एकच काम...जखमींच्या मदतीला धावणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरिदाबाद - १२जानेवारी २०१६. मंगळवारचा दिवस. वेळ सकाळी वाजता. सेक्टर-९, बायपास रोडवर ट्रकच्या धडकेने तीन लोक जखमी होऊन पडलेले. त्यांच्या व्हॅनचा चुराडा झालेला. वाटसरू थांबून जखमींना पाहत आहेत, मात्र जवळ जायला कोणीही तयार नाही. अचानक वेगाने एक व्हॅन येऊन थांबते. गर्दीतून वाट काढत एक बुजुर्ग पुढे येतात. अपघातग्रस्त व्हॅनच्या खिडकीला स्वत:च धक्का मारून उघडतात आणि जखमींना आपल्या व्हॅनमध्ये घेऊन रुग्णालयाच्या दिशेने रवाना होतात. रस्त्याने ट्रॅफिक दूर सारत त्यांना रुग्णालयात पोहोचवतात. वेळीच मदत मिळाल्याने तिघांचेही जीव वाचतात. मदतीला धावणाऱ्या या ६५ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे एस. के. शर्मा. त्यांनी ८० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करून जीव वाचवल्याचे त्यांना ओळखणारे डॉक्टर सांगतात.

डॉक्टरांकडून रस्त्यावर उतरण्यास मनाई : एस.के.शर्मांना तीन वर्षांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना शर्थीचे प्रयत्न करून वाचवले.डॉक्टरांनी शर्मांना पुन्हा रस्त्यावर उतरण्यास, धुळ-मातीपासून दूर रहाण्यास जास्त परिश्रम घेण्यास मनाई केली आहे. तरीही काही दिवस विश्रांती घेऊन ते पुन्हा रस्त्यावर उतरले आणि वाहतूक नियंत्रण करू लागले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुपवर मदतीचे नेटवर्क
ऑटोपार्ट‌्स कंपनीचे मालक एस. के. शर्मांचा बराचसा वेळ त्यांच्या कार्यालयात नव्हे तर रस्त्यावरच जातो. शर्मांनी वर्षांपूर्वी आपल्यासारख्या लोकांना जोडण्यासाठी रस्ते सुरक्षा संघटना स्थापली. आजवर संपूर्ण हरियाणातून ३७०० लोक संघटनेचे सदस्य बनले आहेत. एकट्या फरिदाबादेत ९७ सदस्य आहेत. हे लोक दररोज आपले सहा ते सात तास महामार्गावर घालवतात. रस्ते अपघातात जखमींना मदतीची व्यवस्था करतात. शर्मांनी गो सेफ इन फरिदाबाद’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला आहे. त्यात महामार्ग वाहतूक महासंचालक, पोलिस आयुक्त, सर्व डीसीपींसह सुमारे २०० अधिकारी सामान्य लोक सदस्य आहेत. ग्रुपवर हायवेवरील वाहतूक कोंडी, अपघाताची माहिती अपडेट केली जाते. माहिती थेट पोलिस नियंत्रण कक्षाला पोहोचते. त्यामुळे पोलिस थेट घटनास्थळी पोहोचतात.

एका बापलेकाचा दु:खद मृत्यू पाहिला, त्यानंतर निर्णय घेतला
शर्मा सांगतात की,१३ वर्षांपूर्वी वल्लभगड राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताने मला हेलावून टाकले होते. दुचाकीस्वार बापलेकांना ट्रकने चिरडले होते. कोणीच हात लावायही तयार नव्हते. तेव्हाच मी निर्णय घेतला की मी एक प्रयत्न करणार. मी अपघात टाळू शकत नाही, पण एक प्रयत्न तर करू शकतो. त्यांची कार कुठेही कोंडीत फसू नये म्हणून शर्मांनी परवानगीने कारवर माइक स्पीकर लावला आहे.
बातम्या आणखी आहेत...