आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Faridkot King’S Daughters Win Back 20,000 Crore Property

PHOTOS : वडिलांनी केले बेदखल, पण कोर्टाने मिळवून दिले 20 हजार कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंडीगड - फरिदकोटचे महाराजा सर हरिंदरसिंग यांच्या दोन मुलींनी २१ वर्षांची कायदेशीर लढाई जिंकून मनीमाजरा येथील किल्ल्यावर वारसाहक्क मिळविला आहे. जिल्हा न्यायालयाने महाराजांच्या मुलींच्या बाजूने निकाल दिला आहे. या निर्णयाने मनीमाजरा येथील किल्ल्याव्यतिरिक्त फरिदकोट, दिल्ली, हैदराबाद, हिमाचल प्रदेश येथील सुमारे २० हजार कोटी रुपये बाजारभाव असलेल्या संपत्तीचा हक्क मुलींकडे चालून आला आहे. आतापर्यंत ही संपत्ती महाराजांचे नोकर, वकिल आणि इतरांच्या ताब्यात होती. महाराजांची मुलगी अमृत कौरने संपत्ती ट्रस्टच्या स्वाधिन करण्याच्या निकालाला न्यायालयात आव्हान दिले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी रजनिश कुमार यांच्या न्यायालयाने निकाल देताना सांगितले आहे, की १ जुन १९८२ रोजी तयार करण्यात आलेले मृत्युपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहे. महाराजांच्या संपत्तीवर त्यांच्या मुलींचा हक्क आहे.

एकूलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्यानंतर महाराज वैफल्यग्रस्त झाले होते.... यावेळी त्यांच्या विश्वासूंनी त्यांना फसविले... परंतु, महाराजांनी त्यांच्या मोठ्या मुलीच्या नावावर का केली नव्हती संपत्ती, वाचा पुढील स्लाईडमध्ये...