चंदीगड- मराठवाड्यातीलदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना धान्य पुरवठा करण्यासाठी दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाने देशभरात उपक्रम हाती घेतला आहे. चंदीगड येथील नागरिकांनी यास प्रतिसाद देत अन्नदान मोहिमेत सहभाग घेतला. पंधरा टन धान्य जमा करून ट्रकला गुरुवारी (१५ ऑक्टोबर) हिरवी झेंडी दाखविली. हे धान्य मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सोपविले जाणार आहे.
मराठवाड्यासाठी धान्य भरलेले ट्रक रवाना करतेवेळी बाबा क्लिनिक डॉक्टर विभा फिटनेस सेंटरतर्फे डॉ. विभा, चंदीगड व्यापार मंडळाचे अध्यक्ष चरंजीव सिंह, प्रापर्टी कंसल्टंट असोसिएशनचे कमलजीतसिंह पंछी, सती माता मंदिर भंडारा मंडळ चंदीगडचे नरिंदर संदल, एसडीएचएचे उपाध्यक्ष उषा गुप्ता, मुख्य पॅट्रन बीबी गुप्ता, सचिव संजय शर्मा, समन्वयक सुलोचना , चंदीगड भास्करचे स्टेट एडिटर दीपक धीमान, सीईआे विजय कुमार आदींची उपस्थिती होती. चंदीगड येथून पाठविलेले धान्य मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील झिरपी (ता. अंबड) येथे पाठविण्यात येणार आहे.