आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Is Is Earning Lakhs By Pearl Farming In Bihar

बिहारमधील हा शेतकरी दीड एकर तलावातून काढतो मोती, लाखोंची कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेगूसराय( बिहार) - तेतरीचा शेतकरी जयशंकर कुमार बूढी तलावातील गोड्या पाण्‍यात मोती उत्‍पादन करत आहे. मोती उत्‍पादनाच्‍या माध्‍यमातून जयशंकर लाखों रुपयांची कमाई करत आहे. अधिकाअधिक शेतक-यांनी असा प्रयोग केला तर मोती उत्‍पादन मोठ्या प्रमाणावर होईल आणि शेतकरी सधन हाईल असे जयशंकर यांना वाटते. दीड एकरचा तलाव 'इंटिग्रेटेड पर्ल फार्मिंग' अजोड नमुना आहे.
(फोटो - मोती उत्‍पादन प्रकल्‍प आणि चौकाेनात शेतकरी)
जय शंकर कुमार बेगूसराय जिल्‍हातील डंडारी ब्‍लॉकमधील तेतरी गावाचा रहिवासी आहे. गुजरातमधील छोट्या उदयपूर परिसरात आदिवासी अकादमी, तेजगढमध्‍ये रिसर्च स्‍कॉलरच्‍या रुपात काम करत असताना 'भटक्‍या विमुक्‍त जमाती' सोबत काम केले. त्‍यादरम्‍यान त्‍यांना 'मोती उत्‍पादनाची' प्रेरणा मिळाली.
कसा बनतो मोती
जिवंत शिंपल्‍याचे तोंड उघडून कॅल्शिअम कार्बोनेटचे तुकडे त्‍यामध्‍ये टाकण्‍यात येतात. तुकडे टाकताना शिंपल्‍यातून नॅक्रे नामक रसायन स्‍त्रावते. शिंपल्‍यात टाकलेल्‍या तुकड्यांवर रसायन जमा होते. जेवढ्या दिवस शिंपला जिवंत असतो तेवढ्या मोती मोठा होतो.
काय म्‍हणतात मत्स्य वैज्ञानिक
इंटिग्रेटेड फार्मिंगचा हा अनोखा नमुना आहे. कतला, रेहु आदी मासे पाण्‍यामध्‍ये ब्रीडिंग करतात. परंतु, संथ पाण्‍यामध्‍ये पाण्‍यामध्‍ये मासे ब्रीडिंग करतात हा वैज्ञानिकांसाठी संशोधनाचा विषय आहे. गोड्या पाण्‍यात मोती उत्‍पादन क्रांती करु शकते.
किती येतो खर्च
मोती मिर्माण प्रक्रियेत 400 ते 500 रुपये खर्च येतो. बाजारामध्‍ये एका मोतीची किंम 3500 रुपये आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, शिंपल्‍यातून कसा बनतो मोती....