आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा साठवण्याचा देशी जुगाड, निमचच्या शेतकऱ्याचा साठवण प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निमच - जयसिंगपुरा येथील शेतकरी प्रदीप पाटीदार यांनी यंदा कांद्याचे पीक घेतले; पण कांदा बाजारात नेला तेव्हा त्याला भावच मिळाला नाही. जास्त दिवस ठेवला तर कांदा सडण्याचा धोका होता. त्यामुळे त्यांनी इंटरनेटवर शोध घेऊन शीतगृह तंत्राचा अभ्यास केला आणि देशी जुगाड करत अवघ्या २१ हजार ५०० रुपयांत कांदा स्टोअरेज करून दाखवले. त्यात महिनाभर कांदा न सडता व्यवस्थित साठवून ठेवता येतो. आता त्यांचे पाहून धार येथील शेतकऱ्यांनीही कांदा शीतगृहाचे हे तंत्रज्ञान स्वीकारले आहे.
निमच व धार येथील शेतकरी प्रदीप पाटीदार यांनी कांदा महिनाभर न सडता सुरक्षित साठवून ठेवला आहे. शीतगृहाचे हे देशी तंत्रज्ञान नेटवरून शोधल्याचे त्यांनी सांगितले.

असे तयार केले शीतगृह
३० बाय ५० च्या एका खोलीत त्यांनी हे स्टोअरेज तयार केले. खोलीत दोन-दोन फुटांच्या अंतरावर त्यांनी विटा ठेवल्या. त्यावर लोखंडी जाळी ठेवली. पाच ते सात फुटांच्या अंतरावर जाळीवर तळ नसलेले लोखंडी ड्रम ठेवले. त्याच्या वरच्या भागावर एक्झॉस्ट फॅन लावले. प्रदीप यांनी सांगितले की, या पंख्यांची हवा जाळीच्या खालच्या भागातून कांद्याच्या खालच्या भागातून वरपर्यंत पसरते. त्यामुळे सगळा कांदा दीर्घकाळ थंड राहतो व खराब होत नाही.

महिनाभर कांदा अशाच प्रकारे ठेवला व त्यातील एकदेखील कांदा खराब झाला नाही. स्टोअरेजच्या प्रत्येक कोपऱ्यात थंड हवा पसरते. या तंत्राच्या साह्याने पावसाळ्याचे चार महिने कांदा स्टोअर करून नंतर चांगला भाव आल्यानंतर विकणार आहोत.

२० हजारांची जाळी व पंखे
प्रदीप यांनी शीतगृह बनवण्यासाठी दोन-दोन हजार रुपयांत जुने ड्रम खरेदी केले. जुन्याच लोखंडी जाळ्या विकत घेतल्या व अवघ्या एका दिवसात कांदा शीतगृह तयार केले. कांदा खराब होण्याची भीती राहिलेली नसल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात कांदा शेती करून तो स्टोअर करून पावसाळ्यानंतर चांगला भाव मिळवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...