आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्‍यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाबमध्ये शेतकरी रस्‍त्‍यावर, ठिकठिकाणी रास्‍ता रोको

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूरमध्ये शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून दिला होता. आंदोलनात तरुण शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. आंदोलनामुळे वाहतूकही ठप्प झाली होती. - Divya Marathi
जोधपूरमध्ये शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून दिला होता. आंदोलनात तरुण शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. आंदोलनामुळे वाहतूकही ठप्प झाली होती.
चंदिगड/जयपूर - मध्य प्रदेशातील गोळीबारात पाच शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रकरण अजूनही धगधगत आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थानातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी या घटनेच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. निदर्शकांनी काही राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करून आपला संताप व्यक्त केला. शेतकरी समुदायाचे समाधान करण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला.
 
हरियाणात भारतीय किसान युनियनचे नेते गुरनाम सिंह यांच्या नेतृत्वाखाली अंबाला येथे महामार्गावर आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी या रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून वाहतूक रोखली होती. रोहतक, सोनीपत, हिसार, सिरसा, जिंद, भिवनी आणि चरखी दादरीमध्ये देखील शेतकऱ्यांनी निदर्शने करुन आपला संताप व्यक्त केला. अंबाला महामार्गावरील आंदोलनामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली होती. तीन तास हे आंदोलन चालले. हरियाणातील सर्व राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्यात आले होेते. शेतकऱ्यांनी आंदोलन अतिशय शांततेत केले. कोठेही अनुचित प्रकार घडून आला नसल्याचा दावा सिंह यांनी केला.
 
आंदोलनात ६२ शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी देशभरातील राष्ट्रीय महामार्ग तीन तास चक्का जाम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काँग्रेस, लोकदर पक्षाने या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांनी कुरुक्षेत्र येथे शुक्रवारी किसान पंचायतीचे आयोजन केले होते.

पुन्हा शेतकरी आत्महत्या
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मूळ गावी गेल्या चोवीस तासांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ८ जून पासून राज्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे. मुकेश यादव (२३) यांनी गुरुवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. ते मूळचे सीहोरचे आहेत. खाजू खान (७५) यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.

 
बातम्या आणखी आहेत...